हाथरस येथील युवतीच्या मारेक-यांना फाशी द्या : आम आदमी पार्टी

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपींना त्वरित फाशी द्यावी अशी मागणी भद्रावती आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली आहे. सदर पिडीत युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे दि.1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हातात फलक घेऊन निर्दशने करून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

उत्तर प्रदेशातली स्थिती अत्यंत खराब असून योगी सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी ही मागणी यावेळी आम आदमी पक्षा तर्फे करण्यात आली. भद्रावती शहरातील आपचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते आप आपल्या हातात या घटनेचे निषेध करणारे फलक घेऊन या घटनेचा विरोधात घोषणा करून निषेध व्यक्त केला. युपी योगी सरकारच्या विरोधात घोषणा देत या घटनेतील नराधमांना त्वरित कठोर शिक्षा देऊन फक्त फाशीच द्यावी व त्या पीडित युवतीस योग्य न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सोनल पाटील, उपाध्यक्ष विनीत निमसरकर, कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे ,दीपक वनकर, सुमित हस्तक, अभिषेक रंगारी, नावेद शेख, सोनू सिंग आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन सादर केले.