किरकोळ भांडणातून पत्नीने घेतला गळफास

देहूरोड  :  पोलीसनामा ऑनलाइन

पती आणि पत्नी यांच्यात पैशावरून झालेल्या वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सहाच्या सुमारास समोर आली आहे. वर्षा मनोज माने (वय-२८ रा. साई नगर,मामुर्डी देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास पती मनोज माने आणि मयत पत्नी वर्षा मनोज माने यांच्यात पैश्यावरुन वाद झाला. यातूनच पती मनोज नेपत्नीच्या कानशिलात लगावली. भांडण झाल्यानंतर पती बाहेर निघून गेला. मात्र भांडण झालेल्या रागातून पत्नी वर्षा ही आतील घरात गेली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास पती मनोज हा घरी आल्यानंतर उघडकीस आली आहे. मनोज हा चालक असून त्याला दारुचे व्यसन आहे. तर पत्नी ही धुणी भांडे धुण्याचे काम करत होती. या दोघांना पाच वर्षांची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.