निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवणारा जल्लाद ‘या’ जेलच्या निगराणीमध्ये, सोडू नाही शकत शहर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गुन्हेगारांच्या डेथ वारंटवर स्वाक्षरी झालेली आहे. फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे. पवन जल्लाद गुन्हेगारांना फाशी देणार यावर मोहर लागली आहे. त्याबरोबर पवन जल्लादवर देखरेख सुरु झाली आहे. मेरठ तुरुंग प्रशासनाला याची जबाबदारी देण्यात आली आहे. 20 जानेवारीपर्यंत पवन जल्लाद तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीत असेल. त्यानंतर पवनला दिल्ली तिहार जेल पाठवण्यात येईल.

दररोज द्यावी लागेल हजेरी 
उत्तर प्रदेश सरकारच्या तुरुंगमंत्र्यांनी तिहार जेल प्रशासनाकडे फाशी देण्यासाठी पवन जल्लादला पाठवण्याची परवानगी दिली आहे. पवन जल्लादला मेरठ जेलमध्ये ठेवण्यात आलेल्या एका रजिस्टरवर हजेरी लावावी लागेल. म्हणजेच तो मेरठ शहराबाहेर जाऊ शकत नाही. पवन जल्लादला आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी शहराबाहेर जाऊ नये.

image.png

दिल्लीत जाण्यापूर्वी दोनदा होणार वैद्यकीय तपासणी 
तुरुंगात जोडण्यात आलेल्या माहितीनुसार 20 जानेवारीला पवन जल्लाद दिल्लीत जाईल. परंतु यापूर्वी दोनदा मेरठ तुरुंग प्रशासन पवन जल्लादचा वैद्यकीय तपास होईल. एकदा 14 किंवा 15 जानेवारी दरम्यान होईल तर एकदा 20 जानेवारीला दिल्लीत जाण्यापूर्वी एकदा होईल. पवन जल्लाद फाशी देण्याआधी तंदुरुस्त असावे यासाठी लक्ष देण्यात येणार आहे.

तीन दोषींना हलवले तन्हाई कोठडीमध्ये
मुकेश, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंह या तीन दोषींना कसूरी वार्डमध्ये हलवण्यात आले आहे. तर चौथा दोषी विनय याला तुरुंग क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आले आहे, जो अत्यंत सुरक्षित सेल आहे. माहितीनुसार डेथ वारंट जारी करण्यात आल्यानंतर आरोपींना डेथ सेलमध्ये पाठवण्यात येते पंरतु दोन दोषींनी सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटीव्ह याचिका दाखल केली आहे. त्यावर अजून सुनावणी होणे बाकी आहे त्यामुळे त्यांना डेथ सेलमध्ये पाठवण्यात आले नाही. कसुरी कोठडीला तन्हाई कोठडी देखील म्हणण्यात येते. यात गुन्हेगारांना एकट्याला ठेवण्यात येते. कैदीला कुठेही येण्याजाण्याची परवानगी नसते. कोठडी बाहेर शिपाई 24 तास पहारा देत असतो. या सेलमधील कैदी कोणाशी बोलू शकत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/