‘BVG’च्या हणमंत गायकवाडांची १६ कोटींची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘हाऊस किपिंग’च्या व्यवसायात एक अग्रगण नाव असणाऱ्या बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांची तब्बल 16 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेडिको कंपनीत गंतवणूक करुन जास्तीचा परतावा देतो असे सांगून फसवणूक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणी हणमंत रामदास गायकवाड (46, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर विनोद रामचंद्र जाधव आणि सुवर्णा विनोद जाधव (दोघे रा. विमाननगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार 26 ते 31 मार्च 2011 मध्ये चिंचवड येथील बीव्हीजी हाऊस मध्ये झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांनी जाधव यांच्याकडे मेडिको कंपनीत गंतवणूक करण्याचे ठरवले. त्यानुसार जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड, आनघा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, बायोडिल लेबोरिट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली, कंपनीने एक कोटी 53 लाख 95 हजार 227 रुपयांचे समभाग दिले. मात्र आता प्रयत्न बाकी कोणताच परतावा दिला नाही.

जाधव यांनी गायकवाड यांची 16 कोटी 45 लाख 4 हज़ार 366 रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

Loading...
You might also like