Hanmunt Nazirkar Case | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या भाच्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – स्वत:सह कुटुंबीयांच्या नावाने 82 कोटी रुपायांची बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर (Suspended Joint Director Town Planning Hanumant Nazirkar) आणि त्याचा भाचा राहुल खोमणे (Rahul Khomane) हे येरवडा कारागृहात आहेत. हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) आणि राहुल खोमणे (Rahul Khomane) हे मागील 100 दिवसापासून येरवडा कारागृहात (Yerwad Jail) असून राहुल खोमणे (Rahul Khomane) याने विशेष न्यायालयात (special court) जामीनासाठी अर्ज (bail Application) केला होता. परंतु विशेष न्यायालयाने राहुल खोमणेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. (Rahul Khomene’s bail application rejected by special court)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याच्यासह 8 जणांविरुद्ध नुकतेच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल (Chargesheet filed in court) केले आहे. यामध्ये त्यांनी 82 कोटी रुपयांची अपसंपदा बागळल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे दोषारोपपत्र 91 व्या दिवशी सादर केल्याने आपल्याला जामीन मिळावा, असा अर्ज राहुल खोमणे (Rahul Khomane) याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे (Anti-Corruption Bureau Investigating Officer Police Inspector Girish Sonawane) यांनी त्याबाबत न्यायालयात यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निवड्याचा दाखला देत हा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.

7 एप्रिलपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत
सरकारी वकील राजेश कावेडिया (Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी सांगितले की,
राहुल खोमणे (Rahul Khomane) (वय-31 रा. शिरवली, ता. बारामती) याला 24 मार्च रोजी अटक (Arrest) करण्यात आली होती.
त्याला 25 मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने प्रथम 1 एप्रिल आणि नंतर 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (police custody) दिली होती.
7 एप्रिलपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) आहे.
त्यांच्यावर 24 जून रोजी सकाळी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.
खोमणे हा मार्चचे 7 आणि एप्रिलचे 29 मे महिन्यातील 31 दिवस व आरोपीने 23 जून रोजी जामीनासाठी अर्ज केला आहे.
जूनचे 23 दिवस अशी गणना केली तर आरोपीनं 90 दिवस पूर्ण होताच मुदतपूर्व अर्ज केला आहे.

वकीलांचा युक्तीवाद
यश पाल गुप्ता विरुद्ध पंजाब सरकार (Yash Pal Gupta vs Government of Punjab) व इतर या केसमधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आरोपीवर 91 व्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. न्यायालयात युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला.

ACB च्या इतिहासातील सर्वात मोठा खटला
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) इतिहासातील हा सर्वात मोठ्या अपसंपदा खटला आहे. तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्यात इतका काळ न्यायालयीन कोठडीत असलेला हा बहुदा पहिलाच गुन्हा आहे. या जामीन अर्जावर सुनावीणी वेळी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.

Web Titel : Hanmunt Nazirkar Case Rahul Khomne s bail application rejected

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 2,000 रुपये; येथे चेक करा यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही 

Survey | 60% कर्मचार्‍यांना वाटते पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल पण काम करण्याचे स्वातंत्र्य असावे : सर्वे 

Paytm Cash Earning | खुशखबर ! Paytm देणार 50 कोटी रुपयांचा ‘कॅशबॅक’, जाणून घ्या का घेतला गेला निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?