दिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात, ‘मला शाहरुख खान खूप आवडतो, मला त्याच्यासोबत…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिद, सिटी लाईट, ओमेर्टो आणि सिमरन यांसाख्या यशस्वी सिनेमे बनवणारे आणि राष्ट्रीय फिल्म अवॉर्डने सन्मानित झालेले बॉलिवूडमधील फिल्म दिग्दर्शक हंसल मेहता आता शाहरुख खानला घेऊन सिनेमा करण्यासाठी तयार आहेत. हंसल सुरुवातीपासूनच शाहरुखच्या अभिनयाचे दीवाने आहेत. शाहरुखला एका उत्तम अभिनेत्याच्या रुपात ते पाहत असतात. हंसल सांगतात की, ते शाहरुख सोबत कोणताही रोमँटीक सिनेमा नाही बनवणार तर, असा सिनेमा बनवणार आहेत जो शाहरुखने साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळा असेल.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात की, मी ब्रँड व्हॅल्यू बाबत कधीच जास्त विचार करत नाही. माझ्यासाठी कथा आणि अभिनेता जास्त महत्त्वाचा असतो. आजच्या अनेक स्टार्सपैकी माझा प्रिय अभिनेता शाहरुख खान आहे. मला तो खूपच आवडतो. तो खूपच चांगला अभिनेता आहे मला त्याच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे.

पुढे बोलताना हंसल म्हणतात की, “कधी दर एखादी चांगली कथा मिळाली तर बात बनलीच म्हणून समजा. जेव्हा ही संधी मिळायची आहे तेव्हा मिळेलच. जेव्हा एखादी कथा मिळेल तेव्हा सर्वात आधी मी शाहरुखला कथा ऐकवेल. जर शाहरुखला स्टोरी आवडली, आणि जर त्याची माझ्यासोबत काम करण्याची इच्छा असेल, तेव्हा मात्र नक्कीच सिनेमा बनवेन.” असे हंसल मेहता यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, ते शाहरुख सोबत काम करण्यास किती उत्सुक आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

डायबिटीज नियंत्रितणात ठेवायचाय ? करा ‘हे’ रामबाण उपाय

फक्त ७ दिवसांमध्ये वजन कमी करण्याचे प्रभावी ‘हे’ ११ उपाय

हस्त मुद्रांचे अनेक फायदे ; थायरॉइड, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या होतील दूर

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

Loading...
You might also like