ऋतिकच्या चित्रपटातील बाल अभिनेत्री, वयाच्या 30 व्या वर्षी करतेय 50 वा चित्रपट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही शो शका लका बूम बूमची करूणा आणि हृतिक रोशनचा चित्रपट ‘कोई मिल गया’ ची क्यूट प्रिया आता खूप मोठी झाली आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानी बर्‍याच दिवसांपासून टिव्ही आणि चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे आणि आता तिने 50 चित्रपटांत काम केले आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानीने नुकतेच सांगितले की, तिचा 50 वा चित्रपट माहामध्ये काम करणे तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तिच्या नवीन चित्रपटाविषयी बोलताना हंसिका म्हणाली की या प्रकल्पामुळे तिला खूप आनंद झाला आहे. दिग्दर्शक यूआर जमीलने बनविलेला हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल.

हंसिका मोटवानी हे दक्षिण सिनेमाचे एक परिचित नाव आहे. 2007 साली तिनी पहिल्या तेलगू चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिने कन्नड आणि त्यानंतर तामिळ सिनेमात प्रवेश केला. हंसिका मोटवानी आता जवळपास 30 वर्षांची झाली असून तिने आपला 50 वा चित्रपटही पूर्ण केला आहे. मात्र, यासह ती अनेक वादातही आली आहे.

हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिकाला बाल कलाकार म्हणून पाहिले होते. या चित्रपटात ती खूपच गोंडस स्टाईलमध्ये दिसली होती. मात्र, अनेक वर्षांनंतर हंसिका हिमेशा रेशमियासोबत आपका सूरूर या चित्रपटात दिसली. इथे तिला इतके मोठे पाहून लोक हैराण झाले. लहान हंसिका इतक्या लवकर कशी मोठी झाली यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता.

2007 मध्ये, हंसिका 18 वर्षांची होती जेव्हा ती आपका सुरूरमध्ये हिमेशबरोबर दिसली होती. मात्र, तिच्या नावावरून असा वाद निर्माण झाला की हंसिकाने पटकन स्वत: ला वाढवण्यासाठी ग्रोम हार्मोन ट्रीटमेंट घेतले ज्यामुळे तिला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळाल्या. जरी हंसिकाने या प्रकरणाबद्दल कधीही काहीही सांगितले नाही. हंसिकाने तिच्या कारकीर्दीत एक उत्तम काम केले आहे आणि आपली एक वेगळी ओळख बनविली आहे.

हंसिका तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि फोटोशूट्ससाठी बर्‍याच वेळा चर्चेतही आली. तिचे नग्न फोटो आणि बिकिनीचे फोटो एकाच वेळी लीक झाले होते, त्यांच्याबद्दल बरेच वाद झाले. याबद्दल हंसिका खूप नाराज होती. या फोटोंवर लोकांच्या प्रतिक्रिया खूप वाईट होत्या ज्याबद्दल तिने बोलले होते. हनंसिकाने शांतता मोडत म्हटले की, काही लोकांनी तिला सांगितले की फोटो लिक झाल्याने टेंशन घेण्याची गरज नाही कारण तिने यापूर्वी बिकिनी शूट केले आहेत. हंसिका म्हणाली की लोकांच्या प्रतिक्रियेमुळे तिला दु: ख झाले.

हंसिकाचा 50 वा चित्रपट माहा संर्दभातही वाद निर्माण झाला आहे. माहाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. ज्याचे कारण होते हंसिकाला साध्वीच्या वेशभूषेत बसून चिलम पिणे. हंसिकावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.