Hanuma Vihari | भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारीच्या ‘त्या’ ट्विटने क्रिकेट जगतात खळबळ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) आगामी कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यानंतर हनुमा विहारीने एक ट्विट करून सगळ्यांनाच गोंधळात टाकले आहे. हनुमा विहारीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हनुमा विहारी (Hanuma Vihari) हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याला जेव्हाही भारतीय कसोटी संघात संधी मिळाली तेव्हा त्याने प्रत्येकवेळी चमकदार कामगिरी करत आपली क्षमता दाखवून दिली आहे. इंग्लंड दौऱ्यावर विहारी भारतीय संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आतासुद्धा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतसुद्धा हनुमा विहारीला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

 

 

यानंतर हनुमा विहारीने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने ना कोणता फोटो शेअर केला आहे. ना कोणत्या आशयाची पोस्ट. त्यामध्ये केवळ त्याने स्वल्पविराम दिला आहे. त्याच्या या ट्विटमुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या या ट्विटमुळे हनुमा विहारी (Hanuma Vihari) ब्रेक घेणार की नव्या करिअरची सुरुवात करणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या ट्विटपूर्वी त्याने नेटमध्ये सराव करत असलेला एक व्हिडिओ शेअर केला होता. निवडकर्त्यांनी प्रियांक पांचालच्या (Priyank Panchal) नेतृत्वाखालील भारत अ संघात हनुमा विहारीचा समावेश केला आहे, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) ब्लूमफॉन्टेन येथील मँगॉन्ग ओव्हल (Mangong Oval) येथे तीन सामने खेळणार आहे.

 

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विहारीने तयारी करावी अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे.
हनुमा विहारीने आपल्या कारकिर्दीत 94 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 7261 धावा केल्या आहेत.
यामध्ये 21 शतके आणि 37 अर्धशतके यांचा समावेश आहे.
तसेच विहारीने एकदा त्रिशतकसुद्धा झळकावले आहे.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये हनुमाने 80 सामन्यांमध्ये 42.87 च्या सरासरीने 3001 धावा केल्या आहेत.
यामध्ये चार शतके आणि 20 अर्धशतके यांचा समावेश आहे.

 

Web Title :- Hanuma Vihari | hanuma vihari posts cryptic tweet in wake of being snubbed for two test series against new zealand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा