श्री हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलींना प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ 4 उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बुधवारी 8 एप्रिलला संकटमोचन हनुमान जी यांची जयंती आहे. असे म्हणतात की हनुमान जी चा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. यावर्षी ही तारीख बुधवारी 8 एप्रिल रोजी येते. पवनपुत्रांच्या नावाने प्रसिद्ध हनुमानजीच्या आई अंजनी आणि वडील वानरराज केसरी होते.

असे मानले जाते की हनुमानजी यांचे वडील वानरराज केसरी हे कपि प्रांताचे राजा होते. हरियाणाचे कैथल हे आधी कपिस्थल म्हणून ओळखले जायचे. काही लोक त्या ठिकाणास भगवान हनुमानांचे जन्मस्थान मानतात. हनुमानजींच्या जन्मदिवशी त्यांची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात. या दिवशी हनुमानजीला संतुष्ट करण्यासाठी काही खास उपाय केले पाहिजेत, जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हनुमानाच्या वाढदिवशी तुम्हाला नक्की कोणत्या चार गोष्टी करायच्या आहेत, ते जाणून घ्या…

1) श्री राम नामाचे संकीर्तन करावे

भगवान रामचे परम भक्त हनुमानजींना संतुष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला श्री रामाचे नामस्मरण करावे लागेल. म्हणून हनुमान जयंतीनिमित्त प्रभू श्रीरामाचे संकीर्तन करावे.

2) हनुमानाच्या मूर्तीवर दिवा लावावा

कृपया हनुमान जयंतीच्या विशेष दिवशी बजरंगबलीसमोर ज्योत पेटवा. शक्य असल्यास या दिवशी हनुमानासमोर तुपाची ज्योत लावावी. हा उपाय केल्यास हनुमान जी लवकरच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

3) हनुमानजींना भोग चढवावा

हनुमानजींच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या मर्जीनुसार हनुमानजींना भोग चढवावा. परंतु या दरम्यान लक्षात ठेवा की आपण फक्त हनुमानजींना सात्विक आहाराचा भोग चढवावा. शक्य असल्यास डाळपीठ, बुंदीच्या लाडूंचा भोग असावा. यावेळी जर लाडू मिळण्यास काही अडचणी येत असतील तर घरीच काहीतरी गोड पदार्थ तयार करावा.

4) सुंदरकंद पठण व हनुमान चालीसा वाचावी

कृपया हनुमान जयंतीच्या विशेष दिवशी हनुमान चालीसा वाचावी. एवढेच नव्हे तर या दिवसापासून तुम्ही रोज हनुमान चालीसा पाठ करण्याचा नियम करावा. शक्य असल्यास या दिवशी सुंदरकंदही वाचावे.