थेऊरमध्ये हनुमान जयंती साजरी, पण भाविकांना…

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील श्री चिंतामणी मंदिरातील दक्षिणमुखी मारुती मंदिरात आज हनुमान जयंती उत्सव निमित्ताने अत्यंत साधेपणाने महापूजा करण्यात आली मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता आले नाही.

आज चैत्र पौर्णिमा असल्याने श्री हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते,दरवर्षी मंदिरात चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने पहाटे पाच वाजता भजनाचा कार्यक्रम होत असे तर आगलावे बंधू यांच्यावतीने महारुद्रयाग केला जातो परंतु यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने सर्व राज्यातील धार्मिक स्थळे गेली अनेक दिवसांपासून बंद आहेत कोणासही प्रवेश नसल्याने अनेक धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत परंतु मंदिरातील सर्व धार्मिक विधी पूर्ववत चालू आहेत आज पहाटे सहा वाजता मंदिराचे पुजारी मंगलमूर्ती आगलावे यांनी विधिवत महापूजा केली यावेळी चिंतामणीचे पुजारी सुधीर आगलावे, मुकुंद आगलावे तसेच राहुल आगलावे उपस्थित होते सूर्योदयास जन्मोत्सव साजरा करण्यात आला हनुमानास महापौशाख घालण्यात आला होता.