मंदिरात मूर्तीला हार घालताना कोसळून पुजाऱ्याचा मृत्यू : पहा व्हीडिओ 

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – तामिळनाडूमधील एका मंदिरात देवाच्या मूर्तीला हार घालताना तेथील एका पुजाऱ्याचा खाली पडून मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हीडिओ आला आहे. पुजारी मारूतीच्या मूर्तीला हार घालत असताना ही घटना घडली आहे.

मंदिरातील ही मारूतीची मूर्ती साधारणतः २० ते २५ फुटांची आहे. या मुर्तीला हार घालण्यासाठी पुजारी शिडीने वर चढले होते. त्यानंतर त्यांनी काही हार मुर्तीला अर्पण केले. त्यानंतर मूर्तीला हार घालत असताना, शिडीवर उभ्या असलेल्या या पुजाऱ्याचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यांचे डोकं जमिनीवर आदळलं आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हनुमानाच्या मूर्तीला हार घालत असणारा पुजारा अचानक कोसळतो. त्यात त्याचा मृत्यू होतो, अनेकांना पटत नाहीय. पुजारी खाली कोसळले तेव्हा त्यांच्या सहकारी पुजाऱ्यांनी पटकन सावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा तिथंच मृत्यू झाला आहे.

पहा व्हीडिओ