राज्यमंत्री येड्रावकर ‘गनिमी कावा’ करून बेळगावात, ‘बस’ अन् ‘टमटम’ची ‘सफर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरकर यांनी चक्क बस अन् ऑटोरिक्षामधून प्रवास केला आणि गनिमीकावा करत यड्रावकर यांनी सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगावसह सीमाभागात यामुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यांनी आदरांजली वाहिली त्यावेळी शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेले समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश वाचून दाखवला.

यड्रावकर यांनी बेळगावला जाण्यासाठी सर्वप्रथम कोल्हापूर ते कागल टोलनाका असा खासगी वाहनानं प्रवास केला. यावेळी कागल टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. हे पाहून यड्रावकर यांनी खासगी वाहनाला सोडून चक्क एसटी महामंडळाच्या बसनं संकेश्वरपर्यंत प्रवास केला. पोलिसांकडून बसचीही तपासणी सुरू होती. यड्रावकर यांनी संकेश्वर येथून कर्नाटक (KSRTC)च्या बसनं बेळगावमधील KLE Hospital पर्यंत प्रवास केला. बेळगावात पोहोचताच पोलीस ताब्यात घेतील हे लक्षात घेऊन यड्रावकर चक्क 6 प्रवाशांसाठी असणाऱ्या टमटम रिक्षातून प्रवास केला. हुतात्मा चौकात पोहोचत त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यड्रावकर यांच्या गनिमिकाव्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या 1986 सालच्या बेळगाव आंदोलनाची आठवण झाली. अनेकांनी पवारांची आठवण काढत यड्रावकरयांच्या यशस्वी गनिमीकाव्याचं कौतुक केलं. यड्रावकरांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे दिसून आले. देशात पाकिस्तानी घुसू शकतात, बांग्लादेशी, रोहिंग्या घुसू शकतात मग महाराष्ट्रातून बेळगावला कोणी जाऊ शकत नाही हे चुकीचं आहे.” असं राऊत म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like