‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशीच विष प्राशन करून संपवलं ‘खुशी’नं आपलं ‘आयुष्य’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हेलेंटाईन हा दिवस सर्व प्रेम करणारे मोठ्या उत्सहाने साजरा करतात मात्र याच दिवशी विष प्राशन करून एका महिलेने आपले जीवन संपवले आहे. नोकरी न मिळाल्याने ही महिला खूप परेशान होती यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. तिचा पती मुंबईला नोकरी करत होता.

पोलिसांनी खोलीतून उंदीर मारण्याचे औषध केले जप्त
बागेश्वर येथील पुड़कुनी ठिकाणी राहणारी खिला उर्फ ख़ुशी 30 जानेवारी रोजी हल्द्वानी येथे आली होती. तिने तीन हजार रुपयांनी भाड्याने घर घेतले होते. घरमालकाने सांगितले की ती याठिकाणी एका सीलाईचा क्लास करत होती. शुक्रवारी खोलीतून कोणताही आवाज न आल्याने घरमालकाने दरवाजा उघडला असता ख़ुशी पडलेली दिसली तिचे शरीर थंड होते तसेच तिने खूप उलट्या देखील केल्याचे आढळून आले. पोलिसांना खबर देताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृत महिलेच्या भावाला आणि पतीला याबाबत माहिती दिली.

कोणाला सांगू नका माझा शेवटचा दिवस आहे
मोबाईलचे रेकॉर्डिंग पाहून पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली आहे की, तिने कुटुंबातील सदस्यांना रात्री फोन केला होता आणि म्हंटले होते की आज माझा शेवटचा दिवस आहे कोणाला सांगू नका. शी एकदम साधी आणि सरळ असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

खुशीच्या फोनवर चाळीस मिस कॉल आलेले होते आणि ती आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिने नोकरीसाठी प्रयत्न देखील केला होता परंतु कोठेही नोकरी न मिळाल्याने ती नाराज झाली होती. तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते सासर आणि माहेर सोडल्यानंतर ती खूप एकटी पडली होती कदाचित यामुळेच ती तणावग्रस्त झाली होती.

You might also like