मराठा समाजाला कोर्टानं दिलेलं आरक्षण ही आनंदाची गोष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाला अखेर मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली. यामध्ये मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या निर्णयात हायकोर्टाने शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण वैध आहे असं म्हटलं आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. यासंदर्भातल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळून लावताना आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं सांगत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा कायदा कोर्टाने वैध ठरवला आहे.

त्यानंतर हे आरक्षण न्यायालयाने मंजूर केल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे अभिनंदन करत सभागृहातील विरोधकांचे देखील आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे देखील आभार मानले. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आणण्यासाठी दोन्ही सभागृहाने साथ दिली. त्याचे मी आभार मानतो. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी सत्तेतील सहभागी पक्ष शिवसेना आणि मराठा समन्वयक समितीचे देखील त्यांनी आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी आभार मानतच सभागृहात सर्वत्र ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे अभिनंदन केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मराठा समाजातील अनेक तरुणांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना विजयाच्या घोषणा देखील दिल्या.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

Loading...
You might also like