ट्विटरवर Happy Bday PM Modi जोरदार ट्रेंड, जगातील टॉप 2 मध्ये PM मोदींचा ‘जन्मदिवस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नरेंद्र मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. सकाळीच मोदींनी सरदार सरोवराला भेट दिली. त्यानंतर ते नर्मदेची आरतीही करणार आहेत. मातोश्री हिराबेन यांचे आशीर्वाद घेऊन पुढील दिनक्रमासाठी नरेंद्र मोदी प्रस्थान करणार आहेत.

सोशल मीडियावर आज मोदींच्या जन्म दिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. यामुळे #HappyBdayPMModi जगभरात दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्डिंगमध्ये आहे. १७ सप्टेंबर १९५० रोजी मोदींचा जन्म गुजरातच्या वडनगर येथे झाला होता आज ते ६९ वर्षांचे झाले आहेत.

PM Modi Birthday

सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो भारतीयांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतात ट्विटवरील टॉप आठमधील सात टॉपिक हे पंतप्रधान मोदी यांच्या जन्म दिवसाबद्दल ट्रेण्डिंगमध्ये आहेत. #HappyBdayPMModi या हॅश टॅगवरून सकाळी सडे दहा वाजेपर्यंत ७८ हजार पेक्षा जास्त ट्विट आले होते त्याचप्रमाणे #happybirthdaynarendramodi या हॅशटॅग वरून सुमारे ६५ हजारापेक्षा जास्त ट्विट आलेले आहेत. #HappyBirthdayPM या हॅशटॅगवरून १२.७ हजारांपेक्षा जास्त शुभेच्छांचे ट्विट आले आहेत.

अनेक मोठ्या नेत्यांसह, उद्योजक, क्रीडा मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. भोपाळमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसानिमित्त ६९ फूट लांब असा केक कापण्यात आला.