Happy B’Day Preity Zinta | प्रीती झिंटाच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या रंजक गोष्टी

0
205
Happy B'Day Preity Zinta | bollywood-actress-preity-zinta-birthday-2023-know-about-her-hit-movies-and-life
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Happy B’Day Preity Zinta | आज बॉलीवूडची डिंपल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रीती झिंटाचा वाढदिवस आहे. आज प्रीती तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने गेल्या अनेक वर्षापासून चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. मात्र आजवर प्रीतीने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. या व्यतिरिक्त ती किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण देखील आहे. प्रीतीचा जन्म हिमाचल प्रदेश येथे 31 जानेवारी 1975 रोजी झाला. प्रीती 13 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला आणि या अपघातात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. प्रीतीचे शिक्षण शिमला येथे झाले. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या वैयक्तिक आयुष्य बाबत आणि तिने दिलेल्या हिट चित्रपटांबद्दल. (Happy B’Day Preity Zinta)

 

आज वर प्रीतीने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. 1998 मध्ये आलेल्या ‘दिलसे’ या चित्रपटांमधून प्रीतीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘सोल्जर’,’ कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘कोई मिल गया’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’ या अशा हिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे ठसे उमठवत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली होती. (Happy B’Day Preity Zinta)

 

प्रीतीचे नाव अनेकदा बिझनेस मॅन क्रिकेटर तर कधी अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. प्रीतीचे नाव अभिषेक बच्चन सोबत देखील जोडले गेले होते. कभी अलविदा ना कहना आणि झूम बराबर झूम या चित्रपटांच्या दरम्यान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर प्रीतीचे नाव क्रिकेटर ब्रेट ली तर अभिनेता मॉडल मार्क रॉबिन्सन आणि बिझनेसमॅन नेस वाडिया यांच्यासोबत देखील जोडले गेले होते. त्यानंतर 2016 मध्ये प्रीतीने जीन गुडइनफ बरोबर लग्न गाठ बांधली होती.

 

2021 मध्ये प्रीतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रीती सरोगसीच्या माध्यमातून 46 व्या वर्षी आई झाली.
ही आनंदाची बातमी प्रीतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती.
जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी या जुळ्या मुलांची नावे आहेत.
प्रीती ही तिच्या मुलांचे फोटोज नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

 

Web Title :- Happy B’Day Preity Zinta | bollywood actress preity zinta birthday 2023 know about her hit movies and life

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू