Birthday SPL : ज्यांना पूर्ण शहर ‘लायन’ म्हणून ओळखत होतं, त्यांना ‘या’ हिरोनं बनवलं खतरनाक ‘व्हिलन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हामिद अली खान (Hamid Ali Khan) नावानं हैदराबादला जन्मलेल्या दिग्गज अभिनेत्याला जगात अजित खान (Ajit Khan) नावानं ओळखलं जातं. जवळपास 4 दशकांच्या त्यांच्या करिअरमध्ये त्यांचे चाहते त्यांच्या बोलण्याच्या अंदाजाचे फॅन होते. तसं तर त्यांना नायक म्हणून स्मरलं जातं सुरुवात तर त्यांनी नायक म्हणूनच केली होती. परंतु नायक म्हणून ते चालले नाही तर ते खलनायक बनले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या 10 दमदार भूमिकांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) बेकसूर (1950) – आधी केलेल्या सिनेमात अजित यांचं नाव हामिद अली खान होतं परंतु 1950 साली आलेल्या बेकसूर सिनेमात त्यांनी प्रसिद्ध फिल्ममेकर के अमरनाथ सोबत काम केल्यानंतर अमरनाथ यांनीच त्यांचं नाव अजित ठेवलं. या सिनेमात ते मधुबाला सोबत दिसले होते. त्या वर्षातील तो सर्वता हिट सिनेमा ठरला. अजीतही हिरो म्हणून लोकांच्या नजरे समोर आले.

2) नास्तिक (1954) – एस जोहर यांनी सिनेमाचं डायरेक्शन केलं होतं. देशाच्या फाळणीवर आधारीत सिनेमाची स्टोरी होती. यातील देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान आजही प्रसिद्ध आहे. या सिनेमातही त्यांनी नायकाची भूमिका साकारली आहे.

3) बारादरी (1955) – 1955 साली आलेल्या के अमरनाथ यांनी डायरेक्ट केलेल्या सिनेमात अजित आणि गीता बाली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा एक म्युझिकल रोमँटीक ड्रामा सिनेमा आहे.

4) नया दौर (1957) – प्रमुख अभिनेता म्हणून अजित यांचं करिअर जास्त चाललं नाही. उत्पन्नांच दुसरं साधन नसल्यानं त्यांनी सहायक अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. बी आर चोपडांच्या नया दौर या सिनेमात त्यांनी काम केलं.

5) मुगल-ए-आजम (1960) – के आसिफ डायरेक्टेड या सिनेमातही अजित यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारली होती. या सिनेमात पृथ्वीराज कपूर, मधुबाला, दिलीप कुमार, दुर्गा खोटे असे दिग्गज कलाकार होते.

6) सूरज (1966) – नशीबानं सथ न दिल्यानं त्यांना नायक बनायची इच्छा असूनही ते खलनायक बनले. सूरज सिनेमात त्यांनी पहिल्यांदा खलनायक साकारला. यात राजेंद्र कुमार, वैजयंती माला, मुमताज, जॉनी वॉकर प्रमुख भूमिकेत होते. अजित यांचं करिअर चालत नसल्यानं राजेंद्र कुमार यांनी त्यांना व्हिलन साकारण्याबद्दल सांगितलं. त्यांनीही ते मान्य केलं. राजेंद्र कुमार यांनी शिफारस केल्यानं अजित यांना पहिली खलनायकाची भूमिका मिळाली.

7) जंजीर (1973) – खलनायक म्हणून अजित चालू लागले. त्यांच्या बोलण्याचा अंदाज चाहत्यांना आवडू लागला. जंजीर या ब्लॉकबस्टर सिनेमात त्यांनी काम केलं. यातील त्यांचा एक डायलॉग लिली डोन्ट बी सिली हा डायलॉग खूप गाजला.

8) यादों की बारात (1973) – या सिनेमातील त्यांचा मोना डार्लिंग हा संवाद देखील खूप गाजला. आजही हा डायलॉग बोलला जातो. या सिनेमात धर्मेंद्र, जीनत अमान, तारिक खान, नीतू सिंह, विजय अरोरा आणि अजीत खान प्रमुख भूमिकेत होते.

9) कालीचरण (1976) – सुभाष घई डायरेक्टेड या सिनेमातील अजित यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. यात त्यांच्या एकाच पात्राच्या दोन वेगळ्या रूपातील भूमिका पहायला मिळाल्या. या सिनेमातील त्यांचा क्राईम की दुनिया में हेम लायन के नाम से जाना जाता है हा संवाद खूप गाजला. त्यांचा बोलण्याचा अंदाजही निराळा होता ज्यात ते लायन नाही तर लाइन म्हणत.

10) चरस (1976) – रामानंद सागर यांच्या या सिनेमात अजीत यांनी कालीचरण नावाची भूमिका होती. परफेक्ट व्हिलन आणि बोलण्याचा अंदाज यामुळं त्यांचं खूप कौतुक झालं.