बर्थडे स्पेशल : आयुष्यमान खुराणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अभिनेता, गायक व अँकर असणाऱ्या आयुष्यमान खुराणाचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ रोजी चंदिगढ येथे झाला. विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल सावधान’ पर्यंत त्याच्या सर्व भूमिकांना लोकांनी पसंती दिली आहे.

आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.  बॉलीवूड मध्ये येण्यापूर्वी तो टीव्ही शो होस्ट करण्याचं काम करायचा. छोट्या पडद्यावरील तो सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध अँकर आहे. २०१२ मध्ये त्यांनी बॉलीवूड पदार्पण केले.

२०१२ मध्ये  त्याला ‘विकी डोनर’चित्रपट  मिळाला.  या चित्रपटाची खूप चर्चा झाली. ‘विकी डोनर’ या चित्रपटात आयुष्यमानने स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला फिल्म फेयर चा पुरस्कार प्राप्त झाला होता.  यानंतर ‘नौटंकीसाला’, ‘बेवकूफियां’, ‘हवाईजादा’ हे चित्रपट त्याने केलेत. २०१५ यावर्षी ‘दम लगा के हईशा’ खूप  चित्रपट हिट झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ‘विकी डोनर’मधील पानी दा रंग हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते.
[amazon_link asins=’B01M3QQOAX,B01LY9412H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2645a043-b803-11e8-8dbf-7df14d286e24′]