#BirthdaySpecial : समाजाला फाट्यावर मारत क्रिकेटर अजित आगरकरनं केलं ‘तिच्याशी’ लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकरनं नुकताच आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. 1 डिसेंबर 1977 रोजी जन्मलेल्या अजितनं 191 वन डे सामन्यांत 288 विकेट्स घेतल्या आहेत. अनेकांना हे माहिती असेल की, आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये सक्रिय असताना आगरकर सर्वात हँडसम भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळखला जायचा. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणूने घेणार आहोत. त्याची लव्ह स्टोरीही बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नाही.

1999 मध्ये टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या अजितची फातिमा नावाच्या मुलीशी ओळख झाली. फातिमा ही दुसरी तिसरी कोणी नसून त्याचाच मित्र मजहरची बहिण आहे. मजहरमुळेच अजित आणि फातिमा भेटले आणि त्यांची ओळख झाली. पुढे फातिमा आणि अजितचीही मैत्री झाली.

फातिमा आपल्या भावासोबत सामना पाहण्यासाठी स्टेडियमध्ये यायची. यावेळी अजित आणि फातिमाच्या प्रेमाला सुरुवात झाली.

अजित आणि फातिमा यांच्या भेटीला सुरुवात झाली. पुढे त्यांच्या या मैत्रीचं आणि मैत्रीतील भेटीचं रुपांतर प्रेमात होऊ लागलं.

अजित आगरकर मराठा ब्राह्मण तर फातिमा मुस्लिम होती. धर्म वेगवेगळे असल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

दोघांवर टीका सुरु असताना घरच्यांनीही त्यांच्या या नात्याला विरोध केला. त्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं. परंतु दोघांनी प्रेमापुढे कोणाचीही पर्व केली नाही. सगळी बंधनं झुगारून लावत दोघांनी 9 फेब्रुवारी 2002 रोजी लग्न केलं. आज अजित आणि फातिमाला एक मुलगाही आहे. राज असं त्याचं नाव आहे.

अजितची पत्नी फातिमा आता मुंबईत मॅनेजमेंट सल्लागार म्हणून काम करते. सध्या दोघेही आपल्या संसारात सुखी आहेत. आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत ते आपलं आयुष्य जगत आहेत.