वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडची ग्लोबल स्टार आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा आज ३६ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख प्रियांकाने निर्माण केली. रिअल लाईफमध्ये एक यशस्वी अभिनेत्री सोबतच यशस्वी गायिका आणि यशस्वी निर्माती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या प्रियांकाबद्दल खूप  गोष्टी आहेत. तिला बॉलिवूड मध्ये पिग्गी या इंटरेस्टिंग नावाने ओळखले जाते.

प्रियांकाचा जन्म १८ जुलै १९८२मध्ये झारखंडच्या जमशेदपूर येथे झाला. तिचे वडिल पंजाबच्या अंबालाचे होते तर आई झारखंडची आहे. पिग्गीचे आई-वडिल दोघेही भारतीय लष्करात डॉक्टर होते. ती वयाच्या १३ वर्षांपासून अमेरिकेत काकींसोबत राहत होती. बोस्टनच्या शाळेत तिने प्रवेश घेतला. पण शाळेत तिला वंशभेदाला सामोरे जावे लागले. इथला प्रियांकाचा अनुभव बराच वाईट होता.प्रियांकाला इंजिनिअर बनायचे होते. पण प्रियांकाच्या आईने एका निर्णयाने प्रियांकाचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. युनिव्हर्सिटीत पुढचे शिक्षण घेण्यासाठी प्रियांकाने जे पासपोर्ट साईज फोटो काढून घेतले होते, त्यापैकी काही फोटो प्रियांकाच्या आईने कुणालाही न सांगता मिस इंडिया स्पधेर्साठी पाठवून दिले. या स्पर्धेसाठी प्रियांकाची निवडही झाली. या स्पर्धेत प्रियांका दुसरी रनरअप ठरली. मग मिस वर्ल्डचा ताज प्रियांकाने आपल्या नावावर केला. पुढे ती बॉलिवूडमध्ये आली आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13565ee3-8a59-11e8-8c9c-45a033faef53′]

प्रियांकाने २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिजहन’मधून अभिनयाची सुरुवात केली. २००३ मध्ये सनी देओलच्या ‘द हिरो- लव स्टोरी आॅफ ए स्पाय’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या  प्रियांकाने अभिनयाच्या आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत हॉलिवूडपर्यंत मजल मारली. २००४ मध्ये ‘ऐतराज’मधील निगेटीव्ह रोलने प्रियांकाला खरी ओळख दिली. ‘डॉन’,‘कृष’ या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या लिस्टमध्ये सामील झाली.

[amazon_link asins=’B076CLWKBC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f46f13ab-8a5a-11e8-9622-99e8e46d8b8b’]

प्रियांका चोप्राचे नाव अनेकांशी जोडले गेले. पण रिलेशनशिपऐवजी प्रियांकाने करिअरला महत्त्व दिले आणि सर्वांना मागे सोडत ती यशाच्या शिखरावर पोहोचली.अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मधून तिचा हॉलिवूड डेब्यू झाला. या शोसाठी प्रियांकाने दोनदा पिपल्स चॉईस अवार्ड जिंकला. यानंतर ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात ती दिसली.सध्या ती ‘इजण्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचे शूटींग करतेय.यंदाचा वाढदिवस प्रियांका तिचा कथित बॉयफेन्ड निक जोनाससोबत साजरा करतेय. म्हणजेच प्रियांका सध्या प्रेमात आहे. आपण लग्नासाठी तयार असल्याचे प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले.