#BirthdaySpecial : ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनींना 14 व्या वर्षीच सिनेमांसाठी ‘ऑफर्स’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी आजही राजकारणासोबत अभिनयातही सक्रिय आहे. हेमा यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तमिळनाडूच्या आमानकुंडीमध्ये झाला होता. त्यांच्या आईचं नाव जया चक्रवर्ती आणि वडिलांचं नाव व्हीएसआर चक्रवर्ती आहे. हेमा यांच्या आईला आधीच खात्री होती की त्यांना मुलगी होईल. म्हणून त्यांनी आधीच हेमा मालिनी हे नाव निश्चित केलं होतं. त्यांची आई निर्माता होती. घरी सिनेमाचं वातावरण असल्याने त्यांचा कल सिनेमाकडे होता. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण चेन्नईमधून घेतलं आहे.

हेमा मालिनी यांना 10 वीची परिक्षा देता आली नाही. कारण त्यांना सतत अभिनयासाठी ऑफर्स येत होत्या. त्या अवघ्या 14 वर्षांच्या होत्या. अनेक सुपरहिट सिनेमात काम केलेल्या हेमा मालिनी यांना तमिळ दिग्दर्शक श्रीधर यांनी त्यांना आपल्या सिनेमात घेण्यापासून नकार दिला होता. त्या स्टार अपील नसल्याने त्यांना काम देण्यास त्यांनी नकार दिला होता.

हेमा मालिनी यांनी 1968 साली सपनों का सौदागर या सिनेमातून डेब्यू केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. परंतु अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना हेमा मालिनी खूप आवडल्या. 1970 मध्ये आलेल्या जॉनी मेरा नाम या हेमा मालिनी यांच्या सिनेमाला पहिल्यांदा यश मिळालं. या सिनेमात त्यांच्या आणि देवानंद यांच्या जोडीला खूप पसंती मिळाली होती. 1971 साली आलेल्या अंदाज या सिनेमाने त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला.

1972 साली आलेल्या सीता और गीता हा सिनेमा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. त्यांना अ‍ॅक्टींगसाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांना धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी प्रचंड आवडली. यानंतर त्यांनी ड्रीमगर्ल सिनेमा केला. यात धर्मेंद्र आणि त्यांची जोडी खूप हिट ठरली. यानंतर हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या रिअल लाईफ ड्रीमगर्ल बनल्या.

हेमा यांनी 1981 साली धर्मेंद्रसोबत विवाह केला. हेमा यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे की, त्यांनी धर्मेंद्र सोबत लग्न करण्याचा विचार कधीच केला नव्हता. 1979 साली धर्मेंद्र यांनी नाव आणि धर्म बदलून हेमा यांच्याशी निकाह केला. कारण त्यांना आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश यांना घटस्फोट देता यावा. हेमा मालिनी एक उत्तम डान्सरही आहेत. सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना 2000 साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 150 हून अधिक सिनेमे केले आहेत. सध्या त्या राजकारणात सक्रिय असून त्या मथुरेच्या खासदार आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like