Happy Birthday Kim Sharma | बॉलीवूड अभिनेत्री किम शर्माचे नाव ‘या’ क्रिकेटरशी देखील जोडले गेले होते
पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेत्री किम शर्मा (Happy Birthday Kim Sharma) आज तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. किम आज तिच्या वयाच्या 42 व्या वर्षी देखील खूपच तरुण दिसते. 21 जानेवारी 1990 मध्ये अहमदनगर मध्ये किमचा जन्म झाला. तिने शाहरुख खानच्या ‘मोहब्बते’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. किम तिच्या अभिनयापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली आहे. किमचे नाव आज अनेक कलाकार त्याचबरोबर खेळाडूंबरोबर घेतले गेले होते.
मोहब्बते या चित्रपटात किम शर्मा ने संजना उर्फ संजूची भूमिका साकारली होती.
ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.
42 वर्षाची किम खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ब्यूटिफुल आहे.
किमने अनेक भोजपुरी चित्रपटात देखील काम केले आहे.
एवढेच नाही तर किम ने रामचरणच्या ‘मगधीरा’ त्याचबरोबर ‘यगम’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. 2010 मध्ये किमने अली पुंजानी सोबत लग्न केले होते मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
यानंतर किमचे (Happy Birthday Kim Sharma) नाव क्रिकेटर युवराज सिंह, स्पैनिश शख्स कैरलॉस मैरिन, अली पुंजानी, मेन्सवेयर डिजाइनर अर्जुन खन्ना, हर्षवर्धन राणे, अमित साध आणि लिएंडर पेस यांच्यासोबत देखील जोडले गेले होते. तर सध्या लिएंडर पेस यांच्यासोबत किम लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.
किम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच दोघांचे फोटोज शेअर करत असते.
या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते. त्यांच्या फोटोवर अनेक लाईक कमेंट पाहायला मिळतात.
किमच्या इंस्टाग्राम वर 6 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.
मोहब्बते हा चित्रपट 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एवढ्या वर्षानंतर देखील किम तितकीच सुंदर आणि बोल्ड दिसते.
Web Title :- Happy Birthday Kim Sharma | happy birthday kim sharma looks gorgeous and bold in age 42 know about her personal and controversial life
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sherlyn Chopra | जाणून घ्या कोण आहे शरलीन चोपडा; तिचे फोटोज आहेत एकदम हॉट
Siddharth Jadhav | सिद्धार्थ जाधव लवकरच ‘या’ बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार
Siddharth Jadhav | सिद्धार्थ जाधव लवकरच ‘या’ बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार
Beed Crime News | खरेदीहून येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू