ट्विंकलआधी रवीनाशी झाला होता अक्षयचा साखरपुडा, ‘या’ कारणाने झाले वेगळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (raveena tandon) आपल्या अभिनयाने, सुंदरतेने इंडस्ट्रीमध्ये कमी वेळेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 26 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेली रवीना आज आपला 46 वा वाढदिवस (birthday) साजरा करत आहे. रवीनाने 1991 मध्ये सलमान खानसोबत (salman khan) ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र, 1994 मध्ये आलेला ‘मोहरा’ (mohra) चित्रपटातून (film) रवीनाला खरी ओळख मिळाली.

इंडस्ट्रीमध्ये रवीनाला ‘मस्त-मस्त गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. अक्षय कुमार आणि रवीना स्टारर ‘मोहरा’ चित्रपटातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ गाण्यामुळे तिला हे नाव मिळालं होतं. 1999 मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीवेळी रवीनाने, अक्षयने तिला लग्नासाठी प्रपोज केलं असल्याचे तिने सांगितलं होतं. अक्षय आणि रवीनाने मंदिरात साखरपुडा केला होता.

रवीनाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने ही बाब मान्य केली नाही, कारण त्याला आपलं करिअर आणि फिमेल फॅन्स गमावण्याची भीती होती. रेखा आणि शिल्पा शेट्टीसह अक्षयच्या अफेयरमुळे रवीना आणि अक्षय, दोघांचे मार्ग वेगळे झाले. अक्षय सोबत ब्रेकअप झाल्यानंतर रवीना 22 फेब्रुवारी 2004 रोजी फिल्ममेकर अनिल थडानीसह लग्नबंधनात अडकली. रवीनाचं हे पहिलं परंतु अनिलचं दुसरं लग्न आहे.

You might also like