Happy Birthday Puja Banerjee | लग्नाआधीच गर्भवती होती ‘ही’ अभिनेत्री; एकाच व्यक्ती सोबत केले दोनदा लग्न

पोलीसनामा ऑनलाइन : Happy Birthday Puja Banerjee | अभिनेत्री पूजा बॅनर्जी ‘देवो के देव महादेव’ या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारत घराघरात पोहोचली होती. पूजाने आता भोजपुरी इंडस्ट्रीत एन्ट्री करून पवन सिंह सोबत ‘छट गीत’ या म्युझिक अल्बम मध्ये दिसून आली आहे. तिला या म्युझिक अल्बम मधून खूपच पसंद केले जात आहे. आज पूजा तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत आहे. पूजा बंगाली परिवारातून आहे. पूजाचे खाजगी आयुष्य देखील खूपच रोमांचक आहे.आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या या आयुष्याबाबत. (Happy Birthday Puja Banerjee)

पूजाचा जन्म 6 फेब्रुवारी 1987 रोजी झाला. एका मुलाखतीमध्ये पूजा ने स्वतःच सांगितले होते की ती पंधरा वर्षाची असतानाच घरातून पळून आली होती. ती पंधरा वर्षाची असताना एका मुलावर प्रेम करायची तिच्यामते तो मुलगा तिच्यासाठी सर्व काही होता. यासाठी ती घरदार सोडून पळाली होती. मात्र यानंतर तिला कळाले की तिचा हा निर्णय चुकीचा होता. पूजा बॅनर्जी तिच्या पर्सनल लाईफमुळे खूपच चर्चेत असते. पूजाने एकाच व्यक्तीबरोबर दोनदा लग्न केले आहे. पूजा ने अभिनेता कुणाल वर्मा सोबत एकदा रजिस्टर मॅरेज केले त्यानंतर तीने धुमधडाक्यात कुणालशी लग्न केले. (Happy Birthday Puja Banerjee)

अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. लॉकडाऊन मध्ये या दोघांनी रजिस्टर मॅरेज केले त्यानंतर 2021 मध्ये गोव्यात धुमधडाक्यात यांचा विवाह पार पडला. रजिस्टर मॅरेजच्या 6 महिन्यानंतर पूजाने एका मुलाला जन्म दिला.
पूजाने आपल्या अभिनयाची सुरुवात साउथ इंडस्ट्री मधून केली होती.
2011 मध्ये अभिनेता निखिल सिद्धांत सोबत ‘वीडू थेड़ा’ या तेलुगु चित्रपटातून तिने सेनेसृष्टीत पाऊल ठेवले.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. तर पूजाच्या अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक होत होते.
यानंतर पूजाने बंगाली चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.
पूजा आपल्या अभिनयासोबतच बोल्ड लूकमुळे देखील चर्चेत असते.
पूजा सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते.
पूजाने आता पर्यंत साउथ, बंगाली आणि टीव्ही विश्वानंतर भोजपुरी इंडस्ट्रीत पाऊल ठेवत पुन्हा एकदा नाव गाजवत आहे.

Web Title :- Happy Birthday Puja Banerjee | happy birthday puja banerjee ran away at age of 15 from home with boyfriend pregnant before marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Pune Kasba-Chinchwad Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांना साद; म्हणाले…