‘या’ व्यक्तीमुळेच बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान अजून अविवाहित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड इंडस्ट्रीतला भाईजान अर्थातच सलमान खान कधी लग्न करणार याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होत असते. बॉलिवूडच्या या ‘दबंग’ खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र एक अशी व्यक्ती आहे, जिच्यामुळे सलमान आजही अविवाहित असल्याचं म्हटलं जातं. या व्यक्तीबद्दल सलमानने स्वतः ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या आठव्या पर्वात खुलासा केला होता.ती व्यक्ती म्हणजे एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. ‘सुपर नानी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त रेखा यांनी त्यांच्या बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने हा खुलासा केला होता.

रेखा आणि सलमान हे दोघंही मुंबईतील बँडस्टँड परिसरात राहतात. किशोरवयीन असताना मी मित्रांसोबत फिरल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील कट्ट्यावर झोपायचो आणि रेखा यांना मॉर्निंग वॉक करताना पाहण्यासाठी पहाटे साडेपाचला उठायचो, असं सलमान या शोमध्ये म्हणाला होता. त्यावेळी माझा योगसाधनेशी काहीच संबंध नव्हता. पण फक्त रेखाजी त्या क्लासमध्ये शिकायला यायच्या म्हणून मी तिथेसुद्धा जाऊ लागलो, असंही त्याने सांगितलं होतं.

यावेळी रेखा यांनीसुद्धा सलमानशी निगडीत एक आठवण सांगितली. सलमान जेव्हा सहा-सात वर्षांचा होता, तेव्हा मी मॉर्निंग वॉकला गेले असता तो सायकलने माझा पाठलाग करायचा. त्याला माहितीच नव्हतं की त्याच क्षणी त्याला माझ्यावर प्रेम जडलं होतं. घरी जाऊन त्याने सर्वांना सांगितलं होतं की मला त्या मुलीशी लग्न करायचं आहे, असं त्या म्हणाल्या. त्यावर सलमानने लगेच उत्तर दिलं, कदाचित म्हणूनच माझं अजूनही लग्न होऊ शकलं नाही.

‘बिग बॉस’च्या चौदाव्या पर्वाचं सलमान सूत्रसंचालन करत असून महेश मांजरेकरांच्या ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाच्या शूटिंगलाही त्याने सुरुवात केली आहे. यामध्ये सलमानसोबत आयुष शर्मासुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे.