शिल्पा शेट्टीसाठी पती राज कुंद्राने लिहली ‘रोमॅंटिक पोस्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज बर्थडे आहे. यानिमित्त तिचे पती राज कुंद्रा यांनी रोमॅंटिक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे.

शिल्पा शेट्टी आज ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज तिला चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिल्पाचे पती राज कुंद्रा यांनी सोशल मिडियावर एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो राज कुंद्रा यांनी शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत दोघांनी एकमेकांचा हात धरला आहे.

ब्लू कलरच्या कपड्यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोसोबत राज कुंद्रा यांनी रोमॅंटिक पोस्ट देखील लिहली आहे.

https://www.instagram.com/p/BqAiPc7A2nQ/

राज कुंद्रा यांनी शिल्पाला टॅग करुन लिहले की, मला शिल्पा जीवनसाथी मिळाली म्हणून मी देवाचे आभार मानतो असे लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावर शिल्पाने उत्तर दिले की, ‘थैक्यूं सो मच जान लव यू ‘

शिल्पावर राज खूप प्रेम करतात. त्यांचे तिच्यावर किती प्रेम आहे हे राज ही सांगू शकत नाही. राजच्या आयुष्यात शिल्पाचे महत्व खूप आहे.

https://www.instagram.com/p/BxqAgfaBVOV/

राज कुंदा यांच्या व्यतिरिक्त बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता माधवनने शिल्पासोबतचा एक छान फोटो सोशल मिडियावर पोस्ट करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर तिची बहिण शमिता शेट्टी हीने देखील शिल्पासोबतचा फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

https://www.instagram.com/p/BybAIc4HXMV/?utm_source=ig_embed

 

Loading...
You might also like