Birthday SPL : देवी पार्वतीचा रोल साकारून फेमस झाली होती सोनारिका भदोरिया ! ‘बिकिनी’ घातल्यामुळं झाली होती ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाइन – लहान पडद्यावर देवी पार्वतीचा रोल साकारून फेमस झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया (Sonarika Bhadoria) आज (3 डिसेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सोनारिकाचा जन्म 3 डिसेंबर 1992 रोजी झाला होता. लहान पडद्यावर तिनं खूप नाव कमावलं आहे.

सोनारिकानं 2011 साली आपल्या अॅक्टींग करिअरला सुरुवात केली होती. तुम देना साथ मेरा या मालिकेत सर्वात आधी दिसली होती. यात तिची निगेटीव्ह भूमिका होती.

लहान पडद्यावर पावर्तीच्या रोलनं तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. देवों के देव महादेव या मालिकेच्या यशानंतर सोनारिका स्टार झाली.

सोनारिका सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. एकदा एका फोटोमुळं ती ट्रोलही झाली होती. तिनं यात बिकिनी घातली होती. पावर्तीचा रोल साकारल्यानंतर तिनं असं केल्यानं लोकांनी तिला ट्रोल केलं होतं.

सोनारिका 2018 साली टीव्हीवरील सर्वात आवडत्या 20 हिरोईनच्या यादीत समाविष्ट झाली होती.

सोनारिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं पृथ्वी वल्लभ- इतिहास भी, रहस्य भी आणि इश्क में मरजावां मलिकेतही काम केलं आहे. देवों के देव महादेव या मालिकेनं तिला ओळख मिळाली. तिनं साऊथ सिनेमातही काम केलं आहे. 2015 साली तिनं तेलगू सिनेमात डेब्यू केला होता. स्पीडुनोडो (Speedunnodu) या सिनेमातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. इडो रकाम आडो रकाम (Eedo Rakam Aado Rakam) हा तिचा तेलगू सिनेमा सुपरहिट होता.