बर्थडे स्पेशल -बॉलिवूड चा  ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार 

मुंबई : वृत्तसंस्था – दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. हळूहळू ही चित्रपट सृष्टी विस्तारत गेली. सुरवातीच्या काही काळात चित्रपटात काम करणं हे काही चांगलं मानलं जात नव्हतं आणि तेव्हा कोणाला आता सारखी चित्रपट सृष्टीची भुरळ ही नव्हती पण आता हॉलीवूड नंतर जगात दुसरा नंबर बॉलीवूड चा लागतो. या बॉलिवूड ने अनेक चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हा अनेक दिग्गज हे योगा – योगाने या चित्रपट सृष्टीत आले.

आणि आपल्याला अनेक सुपरहिट कलाकार मिळाले. ‘दिलीप कुमार’ हे त्यातीलच एका दिग्गज कलाकाराचे नाव. दिलीप कुमार चित्रपटात येण्या आधी चित्रपटसृष्टीत अनेक हिरो होते पण जशी दिलीप कुमार यांची एंट्री झाली तेव्हापासून ते आतापर्यंत दिलीप कुमार या नावाची जादू कायम आहे चित्रपट सृष्टीत असलेले अनेक जेष्ठ अभिनेते हे दिलीप कुमार यांच्या पासून प्रेरणा घेऊन या चित्रपट  सृष्टीत आले. आणि आज बॉलिवूड मध्ये असलेला  किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या अभिनयातही आपल्याला दिलीप कुमार यांच्या अभिनयाची  झलक दिसून येते  दिलीप कुमार यांनी केलेल्या गंभीर आणि दुःखद भूमिकेमुळे त्यांना ‘ट्रॅजिडी किंग’ म्हणूनही ओळखले जाते

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ मध्ये पेशावर येथे  झाला. भारत -पाकिस्तान फाळणी नंतर  त्यांचं कुटुंब हे मुंबईत स्थायिक झाले चित्रपटामध्ये येण्या आधी दिलीप कुमार यांचं नाव ‘मोहम्मद युसूफ खान’ होत. बॉम्बे टॉकीज च्या देविकाराणी यांना  दिलीप कुमार ला  चित्रपटात आणण्याचे श्रेय जाते दिलीप कुमार हे नाव सुद्धा देविकारानी यांनीच दिले होते .

ज्वार भाटा (१९४४) या चित्रपटातून दिलीपकुमार यांनी चित्रपटात पदार्पण केले परंतु या चित्रपटाला फारस यश मिळाले नाही. त्यांचा पहिला हिट चित्रपट जुगनू (१९४७) हा ठरला.  या चित्रपटामुळे  दिलीप कुमार हे यशस्वी चित्रपटाच्या हिरोच्या यादीत दाखल झाले.  १९४९ मध्ये रिलीज झालेला ‘अंदाज’ या चित्रपटात राज कपूर आणि दिलीप कुमार हे दोन दिग्गज कलाकार एकत्र फिल्मी पडद्यावर चमकले हा चित्रपट ही यशस्वी झाला. या नंतर ‘दीदार’ (१९५१)आणि  यानंतर १९५५ मध्ये ‘देवदास’ रिलीज झाला. या चित्रपटात  केलेल्या गंभीर भूमिकेमुळे लोक त्यांना  ‘ट्रॅजिडी किंग’ म्हणून ओळखू लागले.

बिमल रॉय दिग्दर्शित मधुमती (१९५८) या सुपरहिट चित्रपटा  बरोबरच लोकांना चित्रपटातील गाणीआणि  वैजयंती माला व  दिलीप कुमार यांचा अभिनयासह  प्राण यांनी साकारलेला उग्र नारायण नावाच्या खलनायकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली ‘राम और श्याम’ (१९६७) या चित्रपटात केलेल्या  दुहेरी भूमिके ला कोणाचा ही तोड नाही त्यांनी केलेल्या दुहेरी भूमिकेनंतर हेमामालिनीचा ‘सीता और गीता'(१९७२) आणि जितेंद्र यांचा ‘जैसे को तैसा’ (१९७३)हे दुहेरी भूमिकेचे चित्रपट आले. या चित्रपटाची  कथा ही कुठेना कुठे ‘रामऔर श्याम’ या चित्रपटाशी प्रेरित होती.

या नंतर १९८०-१९९० च्या दशकात त्यांचे चित्रपट हिट ठरले विधाता (१९८०),दुनिया (१९८२),कर्मा (१९८६), सौदागर(१९९१) आणि १९८२ मधील रमेश सिप्पी यांचा शक्ती  या चित्रपटात  महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत केलेला दमदार अभिनय कोणीही विसरू शकत नाही. दिलीप कुमार यांनी १९८४ मध्ये आलेला ‘मशाल’ चित्रपटातील ‘ए भाई कोई गाडी रोको’हा शॉट ताप  असतानाही ‘वन टेक’ मध्ये दिला आणि  तो फक्त दिलीप कुमार यांच्या अभिनयानेच आज पर्यंत लोकांच्या स्मरणात आहे.

दिलीप कुमार यांनी सायरा बानो सोबत १९६६मध्ये लग्न केले लग्नाच्यावेळी दिलीप कुमार हे ४४ वर्षाचे तर सायरा बानो २२वर्षाची होती. या दोघांच्या वयामध्ये २२ वर्षाचे अंतर होते लग्नाच्या बरेच वर्ष आगोदर  दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रेमप्रकरण संपूर्ण सिनेसृष्टीत गाजलं दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र मधुबालाच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. हा वाद इतका विकोपाला गेला की मधुबालाच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली.मधुबाला यांच्या आगोदर कामिनी कौशल ही ४०च्या दशकातील अभिनेत्रीवर दिलीपकुमार यांचं प्रेम होत.

त्यांना सर्वश्रेष्ठ अभनेता पुरस्कार – दाग (१९५४), आझाद (१९५६),देवदास (१९५७) नया दौर (१९५८),कोहिनूर(१९६१),लीडर (१९६५),राम और शाम (१९६८),शक्ती (१९८३) या चित्रपटासाठी मिळाले. त्यांनी चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे.