गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मागील अनेक दिवसांपासून घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. गणरायाचा जयघोष, ढोल-ताश्यांचा गजर, आकर्षक रोषणाई अशा उत्साही वातावरणात प्रत्येकाने आपल्या लाडक्या गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या ‘पोलीसनामा’च्या असंख्य वाचकांना हार्दिक शुभेच्छा !

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला…
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी…
सर्व गणेश भक्तांना
“गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा”