PM मोदींनी 2019 मध्ये गाठलं यशाचं ‘शिखर’, 2020 मध्ये राहणार आव्हानांचा ‘डोंगर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९ या वर्षात यश मिळाले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकून केवळ सत्तेत न येता दुसर्‍या कार्यकाळात भाजपा सरकारचा मूळ अजेंडा राबविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे. परंतु सध्या देशावर मंदीचे सावट असून सीएए आणि एनआरसीसंदर्भात देशातील बर्‍याच भागात निषेध सुरू आहेत. अशा परिस्थितीत २०२० हे वर्ष नरेंद्र मोदींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

राजकीय लढाई जिंकण्याची आव्हाने
२०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात भाजपा यशस्वी झाला असला तरी राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मार्ग फार खडतर होता. काॅंग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये भाजपाला सत्तेपासून लांब ठेवले आहे. आता २०२० मध्ये दिल्ली आणि बिहार या महत्वपूर्ण राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. येथे भाजपाला जिंकवण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान
सीएए आणि एनआरसीबाबत देशातील अनेक शहरांमध्ये अल्पसंख्याक समूह खासकरून मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. यामुळे या कायद्याचा देशातील कोणत्याही मुस्लिमांवर कोणताही परिणाम होणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना स्पष्ट करावे लागले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मोदी सरकारने हटवले, यामुळे तेथील परिस्थिती अजूनही सामान्य अवस्थेत नाही. शेकडो राजकीय आणि सामाजिक नेते नजरकैदेत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीरपासून उर्वरित देशाच्या सर्व अल्पसंख्याक समुदायाचा विश्वास जिंकण्याचे मोदी सरकारसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.

अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचे आव्हान
देशाच्या अर्थव्यवस्थेवर सध्या मंदीचे सावट आहे. या मंदीमुळे सरकारची वित्तीय तूट वाढली आहे. यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून याचा परिणाम नोकऱ्यांपासून व्यवसायांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होत आहे. सुस्त अर्थव्यवस्थेचा वेग वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही नरेंद्र मोदी सरकारला वर्ष २०१९ मध्ये फारसे यश मिळालेले नाही.

देशाची आर्थिक व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी, वेगवान होण्यासाठी आणि उच्च विकास दर साधण्यासाठी मोदी सरकारला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. जानेवारी ते मार्च २०२० पर्यंत खाद्यपदार्थावरील महागाई वाढेल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. वाढत्या महागाईमुळे मागणीवर परिणाम होईल आणि अशा परिस्थितीत सरकारला देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणे सोपे असणार नाही.

एनडीएला एकजूट ठेवण्याचे आव्हान
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडली. भाजपा-शिवसेना मैत्री फार जुन्या काळापासून चालत आली होती परंतु ती अखेर तुटली. भाजपापासून शिवसेना वेगळी झाल्याने महाराष्ट्रात एनडीए सरकारला मोठा झटका बसला आहे. त्याचप्रमाणे, भाजपचे मित्रपक्ष आजसू (AJSU) यांच्याशी जागावाटपाबाबत एकमत न झाल्यामुळे या दोघांचा राजकीय मार्ग वेगळा झाला आहे.

याचा राजकीय परिणाम भाजपावर झाला असून ते स्पष्टपणे नजरेस पडत आहे कारण महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांत भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. अशा स्थितीत भाजपाचे नवे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर वर्ष २०२० मध्ये मोठे आव्हान आहे. विशेषत: बिहारमध्ये भाजपाला जेडीयूशी चांगला संबंध ठेवावा लागणार आहे कारण वर्षाच्या अखेरीस तेथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१५ मध्ये जेडीयूपासून विभक्त होऊन भाजपाला राजकीय पेच सहन करावा लागला होता.

शेजारी देशांशी चांगला समन्वय राखणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील आव्हानांवरही मात करावी लागणार आहे. पंतप्रधान मोदींसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे शेजारच्या देशांशी चांगले समन्वय राखणे. पाकिस्तानच्या बाबतीत दहशतवादाशी असलेले संबंध सामान्य कसे करावे हे भारतापुढे मोठे आव्हान असणार आहे. त्याशिवाय नेपाळ, बांगलादेश सारख्या BIMSTEC देशांशी संबंध दृढ करण्याचे आव्हान आहे, जेथे आधीपासूनच चीनचा प्रभाव आहे. आपल्या शेजारी चीनसारखा देश आहे जो आपल्या आक्रमक धोरणामुळे नेहमीच कठीण परिस्थिती निर्माण करत असतो. चीनबरोबर आपले अनेक निराकरण न झालेले प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत, सन २०२० मध्ये पंतप्रधानांना शेजारील देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्याचे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान पेलायचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?