‘निरोगी’ रहायचंय तर ‘हे’ संकल्प करा, आजारांवर खर्च नाही होणार ‘पैसा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निरोगी राहणे हे सध्या एक मोठे आव्हान आहे. तुम्ही जर निरोगी राहिलात तर प्रत्येक काम आनंदाने करू शकतो. त्यामुळे तुमचे पैसे देखील वाचतील नवीन वर्षी निरोगी राहण्याचा संकल्प नक्की करा. अनियमित जीवनशैली आणि वेळेवर न खाणे या दोन प्रमुख कारणांमुळे तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही नियमित आहार घेत असाल तर तुम्ही निरोगी राहू शकता.

हे पाच संकल्प तुम्ही नवीन वर्षी सुरु करू शकता
पहिला संकल्प
निरोगी राहण्यासाठी नवीन वर्षापासून आपल्या आहारात विविध प्रकारच्या गोष्टींचा समावेश करा. आपल्या शरीरात निरोगी राहण्यासाठी 40 पेक्षा जास्त वेगवेगळ्या पोषक पदार्थांची आवश्यकता असते. आणि कोणताही खाद्यपदार्थ इतक्या पोषक गोष्टींची आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. म्हणून आपल्या आहारामध्ये वैविध्य आणा आणि प्रथिने व फायबरचे प्रमाण जास्त असलेले अन्न खा.

दुसरा संकल्प
आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण समाविष्ट करा. आहारात दूध, दही, अंडी आणि चीज समाविष्ट करा. खरं तर, आपल्या आहारात समाविष्ट असलेल्या पदार्थांमधून आपल्याला मिळणारी सर्व कॅलरीज असतात, सर्व कॅलरीज ज्या पदार्थांमध्ये उच्च कार्बोहायड्रेट असतात त्यामधून येतात. अशा परिस्थितीत आहारात संपूर्ण धान्य आणि फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

तिसरा संकल्प
नवीन वर्षापासून कमीतकमी जंक फूड खाण्याचा संकल्प करा. जंक फूडमुळे, आजार आपल्या आजूबाजूला असतात आणि पुन्हा पुन्हा उपचारासाठी डॉक्टरकडे जावे लागते. नवीन वर्षापासून कमीत कमी पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी घरी बनवलेले अन्न खा आणि आजार टाळा.

चौथा संकल्प
नव्या वर्षी तुमच्या आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करा आणि ताजी फळे खा. रोज सकाळी पोट मोकळे असताना एक फळ खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कधीच पोटासंबंधीच्या आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

पाचवा संकल्प
नव्या वर्षी मद्यपान आणि धूम्रपानाचे सेवन करणे टाळा. दारू आणि सिगरेट अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे नव्या वर्षी तुम्ही दारू आणि सिगरेट पिणार नाहीत असाच संकल्प करा.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/