2020 हे वर्ष ‘या’ राशीसाठी ‘लाभ’दायक, काय होणार तुम्हाला फायदा ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2020 हे वर्ष अनेकांचे भाग्य उज्जवल असणार आहे. हे वर्ष अनेक राशींसाठी लाभकारक ठरणार आहे. या वर्षी ना की फक्त तुमची कामे पूर्ण होतील तर धनलाभ देखील होईल.

मेष रास –
या राशीचे लोकांसाठी 2020 हे वर्ष अत्यंत उत्तम असणार आहे. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे यश मिळणार आहे. वैवाहिक आणि कौटूंबिक समस्या देखील दूर होतील. परंतु आरोग्याची काळजी घ्या. वर्षभर सूर्य देवतेची उपासना केल्यास लाभ होईल.

वृषभ –
या राशीला हे वर्ष मध्यम स्वरुपाचे असणार आहेत. आर्थिक संपत्तीत मोठे यश मिळेल. अनेक अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये यश मिळेल. परंतु आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वर्षभर शनि देवाची उपासना लाभकारक ठरेल.

मिथुन –
या राशीची सुरुवात मध्यम स्वरुपाची असेल. यावर्षी करिअरमध्ये मोठे यश मिळेल. वाहन आणि संपत्तीमध्ये लाभ होईल. कौटूंबिक आणि वैवाहिक जीवनाकडे दुर्लक्ष करु नका. पूर्ण वर्ष हनुमानाची उपासना लाभकारी ठरेल.

कर्क –
या वर्षी अनेक बाबीत यश मिळेल. करिअर आणि संपत्तीत यश येईल. परदेशात जाण्याचा योग आहे. या वर्षी विवाह होण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्ष शनि देवचा प्रसन्न असेल.

सिंह –
आर्थिक आणि करिअरसंबंधित समस्या दूर होतील. कौटूंबिक ताळमेळ राहिलं. संपत्तीचा लाभ होईल. सूर्य देव आणि गणेशाची उपासना करा.

कन्या –
नोकरी आणि रोजगारात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात आणि विवाहातील समस्या दूर होतील. संपत्तीसंबंधित वाद मिटतील. संपूर्ण वर्ष दुर्गदेवीची उपासना करा.

तुळ –
विवाह आणि प्रेमात यश येईल. करिअर आणि संपत्तीत लाभ होईल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. शनि देवाची अराधना करा.

वृश्चिक –
नोकरीच्या संकटात येऊ शकते. वर्षाच्या मध्यात जीवनात सुधार होईल. संपूर्ण वर्ष विष्णुची उपासना करा, लाभकारक ठरेल.

धनु –
करिअरमध्ये मोठी परिवर्तन होईल आणि यश मिळेल. कुटूंबापासून दुरावा वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा, संपूर्ण वर्ष शनि देवाची उपासना फायदेशीर ठरेल.

मकर –
आरोग्यात सुधार होईल. सुरुवातीला काही समस्या येईल. परंतु काही बदलानंतर सुधार होतील. यावर्षी आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. शनि देवतेचा जप करणं लाभकारी ठरेल.

कुंभ –
हे वर्ष मध्यम स्वरुपाचे असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या समस्येत सुधार होईल. पूर्ण वर्ष शंकराची उपासना करणं लाभकारक ठरेल.

मीन –
या वर्षी करिअरची समस्या सुटेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उद्योगात आणि भागीदारीकडे लक्ष द्यावे लागेल. सूर्य देवाची उपासना फायदेशीर ठरेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/