सहकारी महिला डॉक्टरचा छळ करणार्‍या वरिष्ठ डॉक्टराला नातेवाईकांनी अक्षरशः तुडवलं; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना Corona काळात कोविड सेंटरमध्ये Kovid Center काम करणाऱ्या नर्स अन् महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. कोविड सेंटरच्या प्रमुख डॉक्टरानेच आपल्या सहकारी महिला डॉक्टराचा Female Doctor छळ केल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतप्त झालेल्या पिडितेच्या कुटुंबियांनी अन् नातेवाईकांनी संबधित डॉक्टराला Doctor बेदम चोप दिला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याने मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले. त्यामुळे या घटनेची पोलिसांत Police नोंद केली नाही.

धक्कादायक ! अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रमुख डॉक्टर Doctor गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला डॉक्टरचा छळ Harassment करत होता.
डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती तिने आपल्या घरी आणि नातेवाईकांना दिली होती.
त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोविड सेंटरचे प्रमुख असलेल्या त्या डॉक्टरला रामलिंग फाट्यावरील एका हॉटेलमध्ये Hotel बेदम चोप दिला.
यावेळी आसपासच्या नागरिकांनी आणि आरोग्य विभागातील Department of Health कर्मचार्‍यांनी घटनास्थळी बरीच गर्दी केली होती.
संबंधित आरोपी डॉक्टर मार्च 2020 पासून शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून तो कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.
तर पीडित महिला डॉक्टर इचलकरंजी Ichalkaranji येथील रहिवासी असून त्या संबंधित कोविड सेंटरमध्ये सहाय्यक महिला डॉक्टर म्हणून काम करत आहेत.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात