Harbhajan Singh | रोहित शर्माऐवजी ‘या’ खेळाडूला करा कॅप्टन, माजी फिरकीपटू हरभजन सिंगची मागणी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Harbhajan Singh | भारतीय संघाचा यंदाच्या टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून (England) दारुण पराभव झाल्याने टीम इंडियाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताला एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यातील आणि मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका करण्यात आली. विशेषतः रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वगुणांवर जोरदार टीका करण्यात आली. भारताची धुरा वेगळ्या आणि धुरंधर खेळाडूच्या खांद्यावर देण्याची गरज असल्याचे अनेक दिग्गज खेळाडूंनी सुचवले. त्यातच आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेदेखील (Harbhajan Singh) आपले मत मांडत भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रवीड (Rahul Dravid) आणि कॅप्टन रोहित शर्मा यांना नवा पर्याय शोधण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.

 

काय म्हणाला हरभजन सिंग?

भारतीय संघाला नव्या प्रशिक्षकाची गरज असल्याचं हरभजन सिंगने म्हटलं आहे. राहुल द्रवीड यांच्याविषयी आपल्याला कमालीचा आदर असून त्यांच्या खेळाचे आपण नेहमीच चाहते राहिले आहोत. मात्र टीम इंडियाला सध्या अलिकडचे निवृत्त झालेल्या एखाद्या खेळाडूची कोच म्हणून गरज असल्याचे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले आहे. तसेच टीमच्या कर्णधारपदाची धुराही वेगळ्या आणि आक्रमक खेळाडूच्या खांद्यावर देण्याची गरज असल्याचे त्याने म्हंटले आहे.

 

हरभजन सिंगने सुचवले हे पर्याय ?

हरभजन सिंगने टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) नाव सुचवले आहे. सध्या टीम इंडियासाठी त्याच्यापेक्षा सरस कॅप्टन इतर कुणी असेल, तर मला वाटत नाही. सध्याच्या टीममधील तो सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे आणि त्याच्याकडे असलेल्या नेतृत्वगुणांची सध्या टीमला प्रचंड गरज आहे असे हरभजन सिंग म्हणाला.
तसेच भारतीय संघातून अलिकडेच निवृत्त झालेल्या एखाद्या खेळाडूची कोच म्हणून टीमला गरज आहे.
आशिष नेहरा (Ashish Nehra) हा त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
आशिष नेहरा हा एक उत्तम कोच आणि टीम इंडियाच्या कामगिरी त्याच्या कोचिंगखाली अधिक सुधारू शकते.”
अशी आशा हरभजन सिंगने व्यक्त केली आहे.

 

 

 

Web Title :- Harbhajan Singh | harbhajan singh demands change in team india captain and coach read

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा