Harbhajan Singh | हरभजन सिंगने केली के एल राहुलची पाठराखण; म्हणाला ‘त्याने कोणताही गुन्हा केला नाही’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Harbhajan Singh | भारताचा स्टार क्रिकेटर सध्या वाईट फॉर्ममधून जात आहे. तो धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. वारंवार संधी मिळूनदेखील तो अपयशी ठरत असल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावरून माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात केएल राहुल वरून सुरु असलेल्या ट्विटर वॉरमध्ये आता भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने उडी घेत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्याने के एल राहुलची पाठराखणसुद्धा केली आहे.

 

दोन दिवसांपूर्वी व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा हे यांच्यात के एल राहुल वरून ट्विटर वॉर रंगले होते. व्यंकटेश प्रसादने केएल राहुलला संघातून बाहेर काढत शुभमन गिलला संघात स्थान देण्याची मागणी केली होती. तर समालोचक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्राने केएल राहुलला अजून संधी मिळावी असे बोलून त्याची पाठराखण केली आहे. या वादात आता हरभजन सिंह याने उडी घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

काय म्हणाले हरभजन सिंह?
हरभजन सिंहने “आपण केएल राहुलला (Harbhajan Singh) थोडा काळ एकटं सोडू शकतो का? त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तो अजूनही अव्वल खेळाडू आहे. तो जोरदार पुनरागमन करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सर्वजण अशा पॅचमधून जातो. तो पहिला आणि शेवटचा नाही. त्यामुळे कृपया तो आपला भारतीय खेळाडू आहे या वस्तुस्थितीचा आदर करा आणि विश्वास ठेवा” असे ट्विट करत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Web Title :- Harbhajan Singh | harbhajan singh indian cricketer tweet on support of klrahul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या