हरभजन सिंहने का साधला राष्ट्रीय क्रिकेट संघ निवड समितीवर निशाणा?

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने राष्ट्रीय क्रिकेट संघ निवड समिती अध्यक्ष एम एस के प्रसाद यांच्यावर निशाणा साधला आहे. करुण नायर याच्या मुद्द्यावरून हरभजनने निवड समितीवर निशाणा साधला आहे. करुण नायर गेले ३ महिने झाले राखीव म्हणून बसून आहे, त्याला अजूनही खेळायला संधी मिळत नाही यावरून हरभजनने निवड  समितीला विचारणा केली आहे. सलग ६ महिने भारतीय क्रिकेट कसोटी सामन्यात समाविष्ट असणारा करुण नायरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी स्थान न मिळाल्याने हरभजन सिंहने निवड समितीच्या निकषांवर शंका उपस्थित केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e09f0f7-c6df-11e8-a254-952c1deeaa22′]

हरभजनचे म्हणणे असे होते की, अरुण नायर हा खेळाडू गेले ३ महिने राखीव म्हणून बसून आहे. त्याला संघात स्थान मिळत नाही. निवड समितीचे हे धोरण समजणे कठीण आहे. पुढे त्याने अशी विचारणाही केली आहे की, संघनिवडीसाठी नेमके कोणते निकष लावले जात आहेत?

पुणे : पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी अश्लिल बोलणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

“ज्याप्रमाणे एखाद्याला यश मिळण्यासाठी अनेक संधी दिल्या जातात त्याचप्रमाणे एखाद्याला अपयशी ठरवण्यासाठी एखादी संधीही दिली जात नाही.” असेही तो म्हणाला. सर्व क्रिकेट प्रकारात मिळून ७०० बळी घेणारा हरभजन म्हणतो की,  “जर करुण नायरऐवजी घेण्यात आलेला हनुमा विहारी विंडीजविरुद्ध अपयशी ठरला तर काय ? मला अशी अजिबात इच्छा नाही की, हनुमा अपयशी ठरावा पण तो अपयशी ठरलाच तर मग तुम्ही पुन्हा करुण नायरकडे वळणार.”

त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी तो आत्मविश्वास मिळविता येईल? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

जाहीरात