हरभजन सिंग आणि पाकिस्तानची BOLD अभिनेत्री वीणा मलिक यांच्यात ‘जुंपली’ ! रंगलं ‘ट्विटर वॉर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक यांच्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या यूएनजीएमधील भाषणावरून सोशल मीडियावर भांडण झाले. यूएनजीए येथे ट्विटरवर इम्रान यांच्या भाषणावर हरभजन यांनी टीका केली.

हरभजन यांनी ट्वीट केले होते, ‘संयुक्त राष्ट्रांच्या भाषणादरम्यान भारताला संभाव्य अणुयुद्ध सूचित केले गेले होते. एक मोठा खेळाडू म्हणून इम्रान खानच्या शब्दांमुळे केवळ दोन देशांमधील द्वेषच वाढेल. सहकारी खेळाडू म्हणून मी आशा करतो की ते शांततेला चालना देतील.

विणा मालिकची चिडचिड :
त्याला उत्तर देताना वीणा मलिक यांनी लिहिले की, ‘पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेबद्दल भाष्य केले. कर्फ्यू हटवल्यानंतर निर्माण होणाऱ्या भीतीदायक वास्तवाबद्दल त्यांनी सांगितले आणि दुर्दैवाने तेथे रक्तरंजित संघर्ष होईल असा अंदाज व्यक्त केला. ही धमकी नसून भीतीदायक गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. तुला इंग्रजी येत नाही का ? असा खोचक प्रश्नही तिने विचारला होता.

हरभजनचा टोमणा :
इंग्रजीत केलेल्या या ट्विटमध्ये वीणाने Surely ऐवजी चुकून Surly असा शब्द वापरला होता, या स्पेल्लिंग मध्ये चुकून तिने ‘e’ टाकला नव्हता. ज्यामुळे तिचे शब्दलेखन चुकीचे झाले. याच मुद्द्यावरून हरभजनने वीणाला टोमणा मारून चोख प्रत्युत्तर दिले.

हरभजनने लिहिले, ‘आपणास काय म्हणायचे आहे (Surely की Surly) ? बघा यांची इंग्लिश. पुढच्या वेळी इंग्रजीत काही लिहिताना आधी ते वाचा आणि मगच पोस्ट करा.

Visit : Policenama.com