हार्दिक-राहुल यांच्यावरील कारवाईचं स्वागत : हरभजन सिंह

वृत्तसंस्था – ‘कॉफी विथ करण’मध्ये  क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने महिलांवर वादग्रस्त विधान केल्यावर अनेक वादळे उठली. अनेक जणांनी पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या वर टीका केल्या. क्रिकेट प्रशासकीय समितीने पुढील चौकशी होईपर्यंत दोघांवरही बंदी घातलेली असून दोन्ही खेळाडू चौकशी समितीसमोर उपस्थित राहण्यासाठी भारतात रवाना झाले आहेत. यानंतर भारतीय संघाच्या माजी खेळाडूंकडूनही या कारवाईचं समर्थन करताना दिसत आहे. हरभजन याने या दोन्ही खेळाडूंवरील कारवाईचं स्वागत केलं आहे.
“अशा प्रकारच्या गोष्टी मित्र-परिवारासोबत चर्चा करतानाही आम्ही विचार करतो, या दोघांनीही एका कार्यक्रमात कॅमेऱ्यासमोर या गोष्टी उघडपणे बोलल्या. आता चाहत्यांचा क्रिकेटपटूंकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलू शकतो. लोकं विचार करतील की सचिन तेंडुलकरही असाच वागत असेल का, अनिल कुंबळेही असाच वागत असेल का ? हार्दिक पांड्याने अजुन भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमचं वातावरण कितीसं अनुभवलं आहे, काही वर्षांपूर्वी तो संघात आलाय. त्यामुळे बीसीसीआयने दोघांवरही केलेली कारवाई योग्यच आहे.”एका  वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरभजन बोलत होता.
तर याप्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र काही दिवसापूर्वी पंड्या आणि राहुलचे समर्थन केले होते या बाबत कोहली म्हणाला होता की  ” पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.