हरभजन आणि युवराज यांच्यात ट्विटरवर ‘फिरकी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे चौथ्या क्रमांकावरील खेळाडू. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये देखील भारताला याचा मोठा फटका बसला. भारताकडे आघाडीला मजबूत फलंदाज असून मधल्या फळीत मात्र भारताकडे अनुभवी फलंदाज नाही. त्यामुळे भारताला सध्या चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची गरज आहे.

त्यावरून हरभजनसिंह आणि युवराज सिंह यांच्यात ट्विटरवर फिरकीयुद्ध रंगले होते. हरभजनसिंह याने चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात कोण योग्य आहे, हे सांगितले. त्यावर युवराज सिंह याने उत्तरावर त्याची फिरकी घेतली. हरभजनसिंह याने ट्विट करत म्हटले कि, भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन हा योग्य पर्याय वाटतो. त्याने भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना शानदार 91 धावांची खेळी करत भारतीय संघाला 36 धावांनी विजय मिळवून दिला. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन चांगला खेळाडू ठरू शकतो. त्यावर युवराजसिंह याने त्याची फिरकी घेत त्यावर ट्विट करताना म्हटले कि, भारताची आघाडीची फळी मजबूत आहे भावा.. त्यांना चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजांची गरज नाही. त्याचबरोबर त्याने एक हसरा इमोजी देखील टाकला. त्यामुळे युवराजने सर्व आघाडीच्या फलंदाजाना एकप्रकारे चिमटाच काढला.

दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडूंना संधी दिली असून एकाही खेळाडूला या स्थानावर जम बसविता आलेला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like