अक्षय कुमारच्या चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीचे ‘ट्विटर’ अकाऊंट ‘बॅन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रसिद्ध रॅपर आणि अभिनेत्री हार्ड कौरने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात असभ्य भाषेचा प्रयोग केला आहे. हार्ड कौरच्या या वर्तनामुळे ट्विटरने त्यांचे अकाऊंट काही काळासाठी सस्पेंड केले आहे.

हार्ड कौरने मोदी आणि शहा यांच्या बाबत असभ्य भाषा वापरून त्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केला होता. या व्हिडीओ दरम्यान हार्ड कौर खलिस्तानी समर्थकांसह होती आणि व्हिडीओमध्ये खलिस्थानच्या मुव्हमेंट विरोधात उल्लेख केला गेला होता. २ मिनिट २० सेकंदाच्या या व्हिडीओ सोबत एका रॅपचाही व्हिडीओ हार्ड कौरने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये खलिस्थानी समर्थक दिसून येत होते.

गेल्या जून महिन्यात हार्ड कौरवर देशद्रोहाचे आरोप करण्यात आले होते. युपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात हार्ड कौरने तिरस्कार करत वाईट कमेंट केल्या होत्या.त्यानुसार कौर यांच्यावर कलम 124 A, 153A, 500, 505 आणि 66 IT एक्ट नुसार केस नोंदवण्यात आली होती.

कोण आहे हार्ड कौर नेमकी –
हार्ड कौरने अनेक बॉलिवूड चित्रपटात आपलं नशीब आजमावल आहे कधी सिंगर म्हणून तर कधी अभिनेत्री म्हणून हार्ड कौर चित्रपटात दिसली आहे.

हार्ड कौर ने बॉलिवूड चित्रपट जॉनी गद्दारमध्ये ‘मूव्ह युवर बॉडी’, बचनाये हसीनोमध्ये लकी बॉय सारखे अनेक गाणे गायले आहेत. २०११ साली आलेल्या अक्षय कुमारच्या पटियाला हाऊसमध्ये सुद्धा हार्ड कौरने काम केलं होत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like