‘बेबो’ करीनाचे ‘कडक’ फोटो पुन्हा एकदा चर्चेत !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आपला आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढामुळे चर्चेत आहे. सध्या कोरोन व्हायरसमुळं करीना घरातच आहे. अशात करीनाचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. करीनानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

करीना कपूरनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. तसे तर हे फोटो जुनेच आहेत परंतु नव्याने सोशलवर चर्चेत येताना दिसत आहेत. काही फोटोत करीनाचा हॉट लुक आहे तर काही फोटोत ती साडीमध्येही दिसत आहे. काही फोटोत अगदीच करीना ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे.

करीनाला फॅशन आयकॉन म्हटलं जातं. नेहमीच तिचा एक वेगळा लुक समोर येताना दिसतो. चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल आणि फॅशन आवडत असते यात मात्र काहीच शंका नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोतही करीना खूपच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे. तिची फिगरही आकर्षक दिसत आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सारेच थिएटर 31 मार्च 2020 पर्यंत बंद आहेत. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

https://www.instagram.com/p/B-F6Z7fnGKc/

https://www.instagram.com/p/B-Cs2tCnOuj/

https://www.instagram.com/p/B-AHrPbJ9GJ/

https://www.instagram.com/p/B98JkRNHMiL/

https://www.instagram.com/p/B94jeE_Bl_v/