Hardeek Joshi – Akshaya Deodhar | “2017 मध्ये माझ्या आईने…..”; अक्षया आणि हार्दिकने सांगितला त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन टीम : 2 डिसेंबरला अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Hardeek Joshi – Akshaya Deodhar) हे लग्न बंधनात अडकले. आज देखील त्यांच्या शाही लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते. हा लग्न सोहळा पुणे येथे पार पडला होता. पण ऑनस्क्रीन राणादा पाठक बाई ते खऱ्या आयुष्यातले नवरा बायको (Hardeek Joshi – Akshaya Deodhar) असा त्यांचा प्रवास कशा पद्धतीने जुळला याची संपूर्ण माहिती दोघांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिली आहे.

 

अक्षया आणि हार्दिक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. यावेळी अक्षया म्हणाली, “जेव्हा ऑन स्क्रीन आपण नवरा बायको म्हणून काम करतो तेव्हा आपले सहकलाकार मित्र-मैत्रिणी अनेक मंडळी आपल्याला चिडवत असतात. हे आमच्या बाबतीत ही झालं होतं. आम्ही प्रेमात पडलो असे आम्हाला काही जाणवलं नाही आणि असं काही होईल असे आम्हाला वाटलं नव्हतं. पण पहिली हुरहूर जाणवली ही मालिका संपल्यानंतर आणि ते मी उखाण्यात सांगितले होते”.

 

 

आपल्या लव स्टोरी बद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, “मालिका संपल्यानंतर आम्हाला एकमेकांबद्दल दुरावा जाणवू लागला. 2017 मध्ये माझ्या आईने एकदा तिला विचारलं होतं. त्यानंतर आई मला पुन्हा म्हणाली की तू एकदा विचारून बघ. यावेळी मी म्हणलो की नको उगाच कशाला. पण आईच्या हट्टासापोटी मी तिला बोललो आणि ती मला विचार करून सांगते असे बोलली. यानंतर एकदा तिचा मला फोन आला आणि घरच्यांशी बोलावं लागेल असं म्हटलं. यावर मी हो म्हणत जेव्हा मी कामानिमित्त पुण्यात येईल तेव्हा नक्कीच भेटेन असे म्हणालो. मी त्यांच्या घरी गेलो आणि तिच्या घरच्यांना भेटलो आम्हाला वाटलं की कदाचित नकार वगैरे येईल. पण झालं उलट थेट लग्नाचा तारखा आल्या आणि त्यांनी आमचं नातं स्वीकारलं”.

 

 

Web Title :- Hardeek Joshi – Akshaya Deodhar | hardeek joshi and akshaya deodhar
open up about their love story in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा