Hardeek Joshi | राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचे कारण; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आपल्या सगळ्यांना माहित आहे. काही महिन्यांपूर्वीच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर या जोडप्याने होम मिनिस्टरमध्ये सहभाग घेतला होता. यादरम्यान हार्दिक जोशीने (Hardeek Joshi) म्हणजेच आपल्या राणादाने एक मोठा खुलासा केला.

काय म्हणाला हार्दिक जोशी ?
मी अँटॉप हिलमध्ये राहायचो. माझी शाळाही दादरच्या हिंदू कॉलनीमधील. त्यामुळे माझं बालपण उत्तम गेलं. माझं शालेय शिक्षण जसं इतर मुलांचं होतं तसंच झालं. माझी आजी उत्तम पेटीवादक होती. दादरच्या भजनीमंडळाची ती प्रमुख होती. पण ती जेव्हा सोडून गेली तेव्हा मी फारच लहान होतो. त्यावेळी मी कलाविश्वात कधी पाऊल ठेवेल असे कोणालाच वाटले नव्हते. मला लहानपणापासून आर्मीचं फार वेड होतं. मला आर्मीत जायचं होतं. त्यानुसारच माझा अभ्यास सुरु होता. कॉलेज त्यानंतर यूपीएससीचे क्लास हे सर्व काही सुरु होतं. त्यानंतर मी चंदीगढला ट्रेनिंगही घेतलं. माझे अनेक मित्र आता आर्मीमध्ये ऑफिसर आहेत. तिथून आल्यानंतर ६ महिन्यांचा अवधी होता, त्या काळात काही तरी करायचं असं डोक्यात होतं.

यानंतर माझ्या अनेक मित्रांनी मॉडलिंग कर असं सांगितलं. त्यावेळी मी मॉडलिंग करायला लागलो. त्यानंतर छोट्या मोठ्या मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्टचा रोल केला. हापूस नावाच्या चित्रपटात मी आणि दादा आम्ही दोघांनी रोल केला होता. त्यावेळी आम्ही दोघेही आंबे खात होतो, एकही डायलॉग नव्हता. आमचे अनेक रिटेक घेण्यात आले. यानंतर हळूहळू मी कामगार कल्याण या नाट्यमंडळात दोन अंकी नाटक करायला लागलो. यानंतर काही काळाने मला राणादाचं पात्र मिळालं, असे हार्दिक जोशी (Hardeek Joshi) म्हणाला.

यानंतर हार्दिक जोशीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
या मालिकेमुळे त्याला राणादा अशी ओळख मिळाली. यानंतर त्याने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
या मालिकेत काम केले. त्यानंतर हार्दिक जोशी काही दिवसांपूर्वी हर हर महादेव या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या
भेटीला आला होता.

Web Title :- Hardeek Joshi | marathi actor hardeek joshi wanted to join army reveled real reason behind acting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड