हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविक आहे तरी कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पंड्यानं गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा केला आहे. 2020 ची सुरुवात हार्दिकनं साखरपुडा करत केली आहे. हार्दिक पंड्याचं नाव उर्वशी रौतेलापासून तर अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे. परंतु अखेर त्यानं नताशासोबत साखरपुडा केला आहे. नताशा आणि हार्दिकच्या साखरपुड्याचा व्हिडीओ नताशानं इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B6yMtYRHs1b/

हार्दिक पंड्यानं समद्रात एका बोटीत गुडघ्यावर बसून फिल्मी अंदाजात नताशाला प्रपोज केलं. तिला रिंग घातल्यानंतर त्यानं तिला किसही केलं. दोघंही खूप रोमँटीक दिसत होते. यावेळी बॅकग्राऊंडला खास म्युझिकही सुरू होतं. हार्दिकनं दुबईत साखरपुडा केला. सध्या सर्वांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे ही नताशा आहे तरी कोण?

https://www.instagram.com/p/B6zThxln3xw/

कोण आहे नताशा स्टानकोविक ?

नताशा स्टानकोविक मुळची सर्बियाची अ‍ॅक्ट्रेस आणि डान्सर आहे जी मुंबईत राहते. मुंबईत ती मॉडेलिंग करते. नताशाचा जन्म 4 मार्च 1992 रोजी सर्बियात झाला. अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी नताशा 2012साली मुंबईत आली होती. आज नताशा सक्सेसफुल आहे.

https://www.instagram.com/p/B6yMaU9nnMn/

डायरेक्टर प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिचं आयटम साँग होतं. अय्यो जी असं या गाण्याचं नाव आहे. बिग बॉसच्या सीजन 8 मध्येही नताशा दिसली होती. फेमस सिंगर बादशाह याच्या डीजे वाले बाबू या गाण्यानं नताशाला खूप लोकप्रियता मिळाली होती. शाहरुखच्या झिरो सिनेमातही तिने छोटा रोल करत अभिनयाची झलक दाखवली आहे. नकुतीच नताशा नच बलिए 9 मध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड एली गोनी सोबत दिसली होती. हार्दिक आणि नताशाच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/