Asia Cup 2018: हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर

दुबई : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्या दुखापती मुळे टीम मधून बाहेर पडला आहे. काल पाकिस्तान विरोधी सामन्याचा वेळी गोलंदाजी करताना हार्दिकचा कंबरेला जबर दुखापत झाली. यामुळे हार्दिक मैदानात जागीच कोसळला. त्यानंतर लगेचच त्याला स्ट्रेचर वरून उपचारासाठी मैदानाच्या बाहेर नेण्यात आले.
हार्दिकच्या जागी दीपक चहैलची वर्णी 
ऑल राऊंडर हार्दिकची जागा भरून काढण्यासाठी ऑल राऊंडर दीपक चहैलची वर्णी लागण्याचे सध्या आसरा दिसत आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, आजच चहल दुबईला रवाना झाला आहे. दीपकने इंग्लंड टी 20 सिरीज मधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे बूमरा झालेल्या दुखापती नंतर दीपक नेच त्याची जागा घेतली होती.
भारताने पाकिस्तान विरोधी आशिया चषकात सामना जिंकला खरा..पण भारताचा ऑल राऊंडर खेळाडू चांगलाच जखमी झाला. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना हार्दिक चेंडू फेकत असताना वेदना असहाय्य होऊन तो अचानक खाली कोसळला स्ट्रेचर वरुन त्याला लगेच मैदाना बाहेर काढण्यात आले. हार्दिक जागी क्षेत्ररक्षणा ची जबाबदारी या वेळी मनीष पांडेने घेतली. केदार जाधव चा गोलंदाजी वर मनीष पांडेने पाकिस्तान चा कर्णधाराची झेल घेत त्याला मैदानातून चालते केले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c54bb8d2-bcb0-11e8-a4ad-7136e2e087c3′]
You might also like