कॉफी विद करण वाद : ‘कुटुंबासोबत गैरवर्तन झालं, वडिलांची खिल्ली उडवली’, हार्दिक पंड्यानं सांगितलं दु:ख

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या आणि बॅट्समन केएल राहुल यांच्यासाठी 2019 ची सुरुवात अजिबात खास नव्हती. दोघंही करण जोहरच्या चॅट शोमध्ये आले होते. कॉफी विद करणमध्ये महिलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आता त्या दिवसांची आठवण काढत हार्दिकनं यावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

कॉफी विद करणच्या 6 व्या सीजनमधील हा किस्सा आहे. महिलांवर वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला निलंबित केलं होतं.

एका मुलाखतीत या सगळ्यावर बोलताना हार्दिक म्हणाला, “जेव्हा असं झालं तेव्हा मी स्वत:ला म्हणालो, चला हे स्विकार करू आणि याला सुधारण्याचा प्रयत्न करूयात. मी जर चूक मान्य केली नसती तर तो हिस्सा आजही माझ्यात असला असता. ती फेज मी झेलली कारण माझं कुटुंब माझ्यासोबत होतं.”

हार्दिक पुढं म्हणाला, “या घटनेनंतर माझ्या कुटुंबावर खूप टीका झाली वडिलांच्या मुलाखतीचीही खिल्ली उडवली गेली. मला सर्वात जास्त या गोष्टीचं दु:ख झालं की, माझ्यामुळं माझ्या कुटुंबाला खूप काही झेलावं लागलं. जे स्विकार्य नाहीये.”

या वादावर एका मुलाखतीत बोलताना करण जोहर म्हणाला होता की, “या प्रकरणी मी स्वत:लाही जबाबदार मानतो कारण तो माझा शो होता. मी त्यांना बोलावलं, प्रश्न विचारले तर यात मीही भागीदार आहे. हे सगळं कसं ठिक करू या विचारानं मला कित्येक रात्र झोप आलेली नाही.”