इंग्लंडमध्ये सर्जरी झाल्यानंतर पांड्याला भेटल्या नीता अंबानी, हार्दिक म्हणाला – ‘थँक्यू भाभी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघातील धुव्वाधार अष्टपैलू व्यक्तिमत्व हार्दिक पांड्या ने नुकतीच लंडनमध्ये पाठीची शस्त्रक्रिया केली यावेळी रिलायन्स समूहाच्या नीता अंबानी यांनी पांड्याची भेट घेतली आणि तब्बेतीची विचारपूस केली. याबाबतची माहिती हार्दिक पांड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. याबाबतचे काही फोटो देखील पांड्याने शेअर केले आहेत.

नीता अंबानी यांनी भेट दिल्यामुळे पांड्याने नीता अंबानी यांचे सोशल मीडियावर आभार मानत लिहिले आहे की, लंडनमध्ये मला भेटायला आल्याबद्दल धन्यवाद वहिनी तुमच्या शुभेच्छा माज्यासाठी खूप प्रेरणादायक आहेत.

हार्दिक पांड्या आयपीलमध्ये मुंबई इंडियन्स कडून क्रिकेट खेळतो ज्याची मालकीण नीता अंबानी आहे. या आधी हार्दिक पांड्याने एक व्हिडीओ टाकला होता ज्यामध्ये त्यांनी आधार घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पस्ट दिसून आले होते. त्यानंतर तो एका व्हील चेअर वरती बसतो आणि स्वतः ती चेअर चालवू लागतो. फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार त्यांच्यासोबत लंडनमध्ये आहेत.

हार्दिक पांड्याने शनिवारी फोटो शेअर करताना लिहिले होते की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तुमच्या सगळ्यांचे आभार लवकरच पुनरागमन करेल तोपर्यंत माजी कमतरता नक्कीच भासेल. 22 सप्टेंबर रोजी भारताच्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर हार्दिक पांड्याला पाठ दुखीला सामोरे जावे लागले होते. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने लंडमधील विशेष डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता.

यानंतर हार्दिक पांड्याला तब्बल तीन ते चार महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पांड्या चार महिने अजून क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पांड्याचे फॅन मात्र येत्या आयपीएलमध्ये त्याची नक्कीच वाट पाहतील.

visit : Policenama.com