हार्दिकनं शेअर केला नताशासोबतचा रोमँटीक फोटो ! चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवू़डमध्ये आपल्या हॉटनेसमुळं धुमाकूळ घालणारी अभिनेत्री नताशा स्टानकोविक गेल्या अनेक दिवसांपासून लव लाईफमुळं चर्चेत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नताशाला सरप्राईज देत हार्दिकनं तिला समुद्रात बोटीवर रोमँटीक अंदाजात लग्नासाठी प्रपोज केलं आणि तिला रिंग घालत साखरपुडा केला. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वीच हार्दिकनं ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमीही दिली. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात आहे. यानंतर दोघं सतत चर्चेत आहेत. नुकतेच या कपलचे काही रोमँटीक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. या फोटोंची खास बात अशी की, यात दोघांचा खूपच रोमंटीक अंदाज दिसत आहे.

हार्दिकनं त्याच्या इंसटावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तो नताशासोबत दिसत आहे. वेगवेगळ्या फोटोत हे कपल वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. यात दोघंही खूपच रोमँटीक दिसत आहेत.

चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडले आहेत. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत या कपलचं कौतुक केलं आहे. अजूनही दोघांचे हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. सध्याच्या काळात हार्दिक नताशाची खूप काळजी घेत आहे. तिच्यासाठी तो स्वयंपाकही करत आहे.