Ind Vs Aus : हार्दीक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला 35 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ३०० धावांचा टप्पा पार केला. विराट कोहली बाद झाल्यानतर संकटात सापडलेल्या भारतीय संघाला जाडेजा-पांड्या या जोडगोळीनं बाहेर काढलं. जाडेजा आणि पांड्या यांनी सहाव्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागिदारी करत संघाला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली.

टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. परंतु, टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला. पण हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकी खेळी ही टीम इंडियासाठी समाधानकारक ठरली.

त्यात हार्दिक रवींद्र ने विक्रमी कामगिरी केली. मयंक अग्रवालला विश्रांती दिल्याने शिखर धवनसह सलामीला शुभमन गिल आला. धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावा करता आल्या. सीन अ‍ॅबोटनं सहाव्या षटकात दलाला (१६) बाद केले. कव्हरला ला उभा असलेल्या अ‍ॅश्टन अ‍ॅगरनं सोपा चेंडू पकडला. विराट शुबमन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला सावरलं. पण अ‍ॅश्टन अ‍ॅगरनं शुभबनला(३३) पायचीत करून हे भागीदारी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अ‍ॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस (१९) झेलबाद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीने मारा करताना भारताच्या धावगतीवर लगाम लावताना फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडलं. लोकेश राहुलने उदास केलं. राहुल ५ धावांवर पायचीत झाला. विराट हा एकमेव आशास्थान टीम इंडियासाठी मैदानात होता पण जोश हेझलवूडनं विकेट काढली विराट ७८ चेंडूत ५ चौकारांसह ७७ धावांवर परत फिरला. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी दीडशे धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिक मालिकेत सलग दुसरे आणि त्याचा कामगिरीतील सहावे अर्धशतक झळकावले. जडेजाने तेरावे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकशी बरोबरी साधली.

जाणून घ्या या आधी खेळाडूंनी तोडलेले विक्रम…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९९ मध्ये सदगोपण रमेश आणि रॉबिन सिंग यांनी १२३ धावांची भागीदारी केली होती तो विक्रम हार्दिक रवींद्र जोडीने तोडला. या दोघांच्या फटकेबाजी च्या जोरावर टीम इंडियाने ५ बाद ३०२ धावा केल्या हार्दिक ७६ चेंडूत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर तर रवींद्र ५० चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर नाबाद राहिला. १९९१-९२ नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथमच भारतीय संघाकडून वन-डे मालिकेत एकही वैयक्तिक शेतकी खेळली गेली नाही तसंच ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे मालिकेत एकाही भारतीय फलंदाजांना शतकी खेळी करताना आल्याची पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घराच्या मैदानावर सहाव्या विकेटसाठी हार्दिक रवींद्र ने दीडशे धावांची भागीदारी केली. या जोडीने श्रीलंकेच्या डी मेंडिस व अरविंद डी सिल्वा यांनी १९८५ साली सहाव्या विकेटसाठी नोंदवलेला १३९ धावांचा विक्रम मोडला. भारतास सहाव्या विकेटसाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अंबाती रायुडू स्टुअर्ट बिन्नी यांनी दोन पंधरा मध्ये जी झिम्बाब्वे विरुद्ध १६० तर महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी २०५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध १५८ धावांची भागीदारी केली होती.

You might also like