Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Hardik Pandya Watch | टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या समोरील अडचणी काही थांबायचे नाव घेईना. सर्वात आधी त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport) त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. मुंबई कस्टम विभागाकडून (Custom department) हि जप्तीची (Hardik Pandya Watch) कारवाई करण्यात आली आहे.

हार्दीक पांड्या (Hardik Pandya Watch) टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता.
तेथून परतत असताना मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून हि कारवाई करण्यात आली.
यूएईमधून (UAE ) मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अडवून त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे (Expensive watches) जप्त करण्यात आली. या घडाळ्यांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे.

हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
आधीच खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या हार्दिक पांड्या याच्यावर आता मुंबई विमानतळावर
कारवाई करण्यात आल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हे देखील वाचा

Dangerous Apps | ‘हे’ 7 अ‍ॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक ! Google ने बॅन केलीत, आता तुम्ही सुद्धा तात्काळ करा डिलिट

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Hardik Pandya Watch | Mumbai Airport customs officials seize two luxury watches worth rs 5 crores hardik pandya airport

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update